"आर. के. वाइन्स'चा परवाना कायमस्वरूपी रद्द 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 एप्रिल 2020

टुबर्ग प्रीमियम बिअर स्ट्रॉंगचा अनधिकृतरीत्या विना वाहतूक परवाना केल्यासह अनेक अनागोंदी तसेच बेकायदेशीर गोष्टी समोर आल्या. त्यामुळे या संबंधातील चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता.

जळगाव ः येथील अजिंठा चौफुलीनजीकच्या "आर. के. वाइन्स'मध्ये "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या "लॉकडाउन'मध्ये गुदामातून चारचाकीद्वारे मद्याची वाहतूक करून ती विक्री केली जात होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने 12 एप्रिलला रात्री सव्वातीनच्या सुमारास कारवाई करून एक लाख दहा हजार 54 रुपये किमतीची देशी-विदेशी दारू, कारसह चौघांना ताब्यात घेतले होते.

क्‍लिक कराः जिल्ह्यातील 34 संशयितांचे अहवाल आले "निगेटिव्ह' 
 

या प्रकरणी गुन्हा दाखल असून, राज्य उत्पादनशुल्क विभागाने याबाबतचा अहवाल सादर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी अहवाल व चौकशीअंती "आर. के. वाइन्स'चा मद्यविक्री परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची आज पारीत केले. 

आर्वजून पहा : Video तपस्वी हनुमान मंदिरात अखंड पुजा अर्चा 
 

स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर राज्य उत्पादनशुल्क विभागाने "आर. के. वाइन्स'चे गुदाम तसेच विविधी बाबींची चौकशी करून अहवाल तयार केला होता. यात विभागाने दिलेल्या परवानगीनुसार गुदामाच्या रचनेत फेरबदल, अनधिकृत प्रवेशद्वार आढळून आले होते. तसेच पुस्तकी साठ्यापेक्षा प्रत्यक्ष साठा कमी मिळून आला. टुबर्ग प्रीमियम बिअर स्ट्रॉंगचा अनधिकृतरीत्या विना वाहतूक परवाना केल्यासह अनेक अनागोंदी तसेच बेकायदेशीर गोष्टी समोर आल्या. त्यामुळे या संबंधातील चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. "लॉकडाउन'च्या काळात आदेशाचे उल्लंघन, मद्याची अवैध वाहतूक व विक्री करून अटी-शर्तीचा भंग केल्याने जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी "आर. के. वाइन'चा परवाना कायमस्वरूपी रद्द केला. 

नक्की वाचा : अठराविश्‍व दारिद्रय तरीही नाकारली मदत...म्हणाले गरजूंना द्या सामान 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon RK Wines' license permanently revoked