दिलासादायक : त्या महिलेच्या संपर्कातील सात जणांचे अहवाल निगेटीव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

महिलेच्या संपर्कातील आलेल्या बारा जणांना ताब्यात घेवून क्‍वारंटाईन करण्यात आले होते. त्यांची तपासणी करून नमुने तपासणीसाठी धुळे येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात पाठविण्यात आले होते. 

जळगाव : मुंगसे (ता. अमळनेर) येथील कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करून नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यातील सात जणांचे अहवाल प्राप्त झाले असून सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली. 

नक्‍की पहा - नंदुरबार होतेय हॉटस्पॉट...आणखी तिघे पॉझिटिव्ह 

मुंगसे (ता. अमळनेर) येथील 60 वर्षीय महिला तीन महिन्यांपुर्वी मुंबई येथे मुलाकडे गेली होती. यानंतर ती महिला औरंगाबाद येथे देखील गेली होती. दरम्यान महिलेला त्रास जाणवू लागल्याने प्राथमिक उपचार गावातील डॉक्‍टरांकडे घेतले होते. मात्र फरक पडत नसून त्रास अधिक जाणविल्याने सदर महिला शनिवारी (ता.18) शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल झाली होती. तिचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. यानंतर सदर महिलेच्या संपर्कातील आलेल्या बारा जणांना ताब्यात घेवून क्‍वारंटाईन करण्यात आले होते. त्यांची तपासणी करून नमुने तपासणीसाठी धुळे येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात पाठविण्यात आले होते. 

पतीचेही नमुने निगेटीव्ह 
अमळनेर तालुक्‍यात आढळून आलेल्या कोरोना बाधित 60 वर्षीय महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींपैकी सात जणांचे नमुना तपासणी अहवाल आज रात्री प्राप्त झाले. या सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये सदर महिलेच्या पतीच्या अहवालाचा देखील समावेश आहे. अन्य व्यक्तींचे तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेले नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon sevan people corona report nigetive