जळगाव जिल्ह्यात सोळाशेवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

पालकमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणी बैठक घ्यावयाची असल्याने प्रकरणे अपात्र का करण्यात व पात्र का करण्यात आली? याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागविण्यात आली आहे. 

जळगाव ः जळगाव जिल्ह्यात कपाशी पीक घेण्यात अग्रेसर आहे. यासोबतच इतर पिकांनाही तो प्राधान्य देतो. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ, कधी वादळ तर चक्रीवादळ यामुळे केळी उत्पादकांपासून सर्वच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सोसावे लागते. कर्जाचा डोंगर असह्य झाल्याने गेल्या 14 वर्षांत जळगाव जिल्ह्यात एक हजार 685 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पैकी केवळ 905 शेतकऱ्यांना शासकीय लाभ मिळाला. मात्र, 748 शेतकऱ्यांना काहीही कारणे न देता त्यांची प्रकरणे अपात्र करण्यात आली. 

येथील हॅप्पी मिरर रिसर्च ऍण्ड मल्टिपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. आशिष जाधव यांनी माहितीच्या अधिकारात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रकरणांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून मागविली. त्यात वरील माहिती उघड झाली. 
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची तब्बल 748 प्रकरणे अपात्र करण्यात आली. मात्र, ती का अपात्र करण्यात आली याची कारणे देण्यात आलेली नाहीत. 2012 मध्ये एकूण 115 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात 77 शेतकऱ्यांची प्रकरणे आर्थिक मदतीसाठी पात्र केली. मात्र, 34 प्रकरणे अपात्र आहेत. त्यातही चार प्रकरणांबाबत पात्र किंवा अपात्र याबाबत काहीही माहिती दिलेली नाही. यामुळे संबंधित आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासकीय आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागले आहे. 

क्‍लिक कराः   video मुस्लिम आणि स्त्रियांना असुरक्षित वाटणे लज्जास्पद  : साहित्यिक भालचंद्र...
 

शेतकरी आत्महत्येच्या अपात्र, पात्र प्रकरणांबाबत कारणमीमांसा आवश्‍यक त्या कार्यवाहीसाठी आवश्‍यक आहे. पालकमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणी बैठक घ्यावयाची असल्याने प्रकरणे अपात्र का करण्यात व पात्र का करण्यात आली? याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागविण्यात आली आहे. 
दुष्काळ, अतिवृष्टी परिणाम शेती पिकांचे झालेले नुकसान, शेतमालाला न मिळालेला भाव यामुळे शेतकरी विविध संस्था, बॅंका, सावकारांकडून काढलेले कर्ज फेडण्यास असमर्थ ठरतो. कर्ज फेडण्याची सर्वच पर्याय खुंटल्याने शेतकरी शेवटचा पर्याय म्हणून आत्महत्या करतो, असे चित्र आहे. 

आर्वजून पहा : मधमाशांनी रोखला अंत्यविधी...शेवटी बोलाविले जेसीबी
 

चौदा वर्षांतील शेतकरी आत्महत्येचा तपशील 
वर्ष--एकूण--पात्र प्रकरणे---अपात्र प्रकरणे 

2006--86--51--35 
2007--78--63--15 
2008--66--40--26 
2009--59--42--17 
2010--67--52--15 
2011--95--61--34 
2012--115--77--34 
2013--94--57--36 
2014--174--76--98 
2015--190--40--150 
2016--171--62--109 
2017--151--105--46 
2018--148--75--73 
2019--191--104--60 
एकूण--1685--905---748 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Sixteen hundred farmers commit suicide in Jalgaon district