शाळा सुरू होण्याबाबत विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 मे 2020

ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. आम्ही आता शाळेतील विद्यार्थ्यांना दररोज व्हॉट्‌सअपद्वारे अभ्यास देत आहोत. निकालही तयार झाल्यावर पालकांना ऑनलाइन पद्धतीने दिला जाईल. 
- दिलीपकुमार चौधरी, मुख्याध्यापक, ए. टी. झांबरे विद्यालय, जळगाव. 

जळगाव  : कोरोना संसर्गाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्व शाळा 25 मार्चपासून बंद आहेत. इयत्ता पहिली ते आठवी, नववी व अकरावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. दहावीचा भूगोल विषयाचा पेपरही रद्द करण्यात आला. देशभरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली असून त्यामुळे लॉकडाउनचा काळही वाढत आहे. अशा परिस्थितीत शाळांचे निकाल रखडले असून पुढील शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू होणार याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. 

क्‍लिक कराः सगळ्यांचे चांगले होईल, माझा आर्शिवाद आहे  कोरोनामुक्त महिलेच्या भावना 
 

राज्यात 25 मार्चपासून लॉकडाउन सुरू करण्यात आले असून आता 17 मे पर्यंत लॉकडाउनचा तिसरा टप्पा असणार आहे. दरवर्षी शाळांचा एक मे पर्यंत निकाल लागतो आणि नवीन शैक्षणिक वर्ष 17 जूनपासून सुरू होते. परंतु यंदा निकालाची प्रक्रिया रखडली असून शाळा सुरू होण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ऑगष्ट, सप्टेंबरपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. 

प्रथम सत्र रद्दची शक्‍यता 
कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता नवीन शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू होईल. यामुळे प्रथम सत्र देखील रद्द करण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. किंवा अभ्यासक्रम कमी करून पहिले सत्र करण्यात येऊन, दिवाळी नंतर दुसरे सत्र सुरळीत करता येणे शक्‍य होणार आहे. 

नक्की वाचा : डॉक्‍टरसह दोघे कोरोना पॉझिटिव्ह...बाधित एक रूग्णही गरोदर पत्नी, मुलासह पळाला 
 

निकालाचे काम सुरू 
पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्या तरी अगोदर झालेल्या परीक्षांची सरासरीवरून निकाल जाहीर केला जाणार आहे. शाळांमध्ये निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर केला जाणार आहे. 

आर्वजून पहा : धक्कादायक: जिल्ह्यात आणखी 19"कोरोना' बाधित! 
 

पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांचे निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. दहावीच्या निकालाबाबत शिक्षण विभागाकडून अद्यापपर्यंत कोणतीही माहिती मिळाली नाही. विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे शैक्षणिक नुकसान होणार नाही. 
-आर. आर. खोरखेडे, मुख्याध्यापक, जिजामाता विद्यालय, जळगाव. 

विद्यार्थ्यांचे निकाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच मोबाईलवरून संदेश किंवा व्हाट्‌सअपद्वारे निकाल देण्यात येणार आहे. पुढील शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासंबंधी शासनाच्या आदेश मिळाल्यानंतरच शाळा सुरू होतील. 
- संजय खंबायत, मुख्याध्यापक, या. दे. पाटील विद्यालय, जळगाव 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon studant and parents Confusion start tby school