"रिक्षा ऑन कॉल' उपक्रमाने रुग्ण,  ज्येष्ठांना झाला आधार - आतापर्यंत 80 जणांचा कॉल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 मे 2020

रुग्ण नेण्यासाठी रिक्षा हवी असल्यास रुग्ण व त्यासोबत एका अशा दोनच जणांना रिक्षात बसता येईल. किराणा सामान, कृषी विषयक साहित्य घेण्यासाठी जायचे असेल तर एकाच व्यक्तीला बसता येईल. शहरातील विविध नगरात रिक्षा तैनात करण्यात आल्या आहेत.

जळगाव ः "लॉकडाउन'च्या कालावधीत अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर वाहनांना परवानगी नाही. नागरिकांची अडचण होऊ नये तसेच रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे, यासाठी शहरात "रिक्षा ऑन कॉल' या उपक्रमास दोन दिवसापूर्वी सुरवात झाली. ज्येष्ठ नागरिक, रुग्णांना यामुळे आधार मिळाला असून, जीवनावश्‍यक खरेदीसाठी, दवाखान्यात तपासणीसाठी ते रिक्षा धारकांना कॉल करीत आहे. 

नक्की वाचा ः जिल्ह्यात बारा तासात सहा पॉझिटीव्ह, एकूण 43 रुग्ण 

लॉकडाउनच्या काळात रिक्षा सेवा बंद आहे. यामुळे रुग्णांचे, ज्येष्ठांचे हाल होताहेत. ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी शहरात "रिक्षा ऑन कॉल' हा उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी परिवहन विभागाला पहिल्या टप्प्यात शहरात 25 रिक्षांना परवानगी देण्यास सांगितली होती. 

जिल्हाधिकाऱ्यांनी 28 एप्रिलला या उपक्रमाची घोषणा केली असली तरी, 29 एप्रिलला दुपारी तीन नंतर संबंधित रिक्षा धारकांना पासेस मिळाल्या होत्या. यामुळे पहिल्या दिवशी पन्नास जणांनी कॉल करूनही रिक्षा सेवा देता आली नव्हती. आजतागायत 80 जणांनी कॉल करून रिक्षा ऑन कॉल सुविधेचा लाभ घेतला आहे, 

हेही वाचा ः  लॉकडाऊन वाढवतोय डोळ्यांचा त्रास..मुलांमध्ये अधिक दूष्परिणाम 

..या क्रमांकावर करा संपर्क 
ज्या नागरिकांना रिक्षाची आवश्‍यकता असेल त्यांनी कैलास विसपुते- 9028212102, दिनेश भावसार 7058789854, विलास ठाकूर 7741921439 या क्रमांकावर संपर्क साधावा. 
रुग्ण नेण्यासाठी रिक्षा हवी असल्यास रुग्ण व त्यासोबत एका अशा दोनच जणांना रिक्षात बसता येईल. किराणा सामान, कृषी विषयक साहित्य घेण्यासाठी जायचे असेल तर एकाच व्यक्तीला बसता येईल. शहरातील विविध नगरात रिक्षा तैनात करण्यात आल्या आहेत. वरील क्रमांकावर संपर्क साधून सेवा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon well response to riksha on call