तरुणाने "कोरोना'वर केली मात... दहाच दिवसांत "ओके',  पुष्पवृष्टीने स्वागत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

होस्टेलमध्ये आगमन झाले असले, तरी या तरुणास आठवडाभर विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. 

जळगाव  : येथील डॉ. उल्हास पाटील महाविद्यालय व रुग्णालयातील तरुणाने आज "कोरोना'वर मात केली असून, त्याचे महाविद्यालय व रुग्णालय परिसरात पुष्पवृष्टी उधळत व टाळ्या वाजवून त्याचे स्वागत करण्यात आले. 

नक्की वाचा :  डोळ्यासमोर बहिणेचे झाले अपहरण... अन्‌ चार जिल्ह्यातील पोलिस उतरले महामार्गावर ! 
 

डॉ. पाटील महाविद्यालय- रुग्णालयातील तरुण गेल्या आठवड्यात "कोरोना पॉझिटिव्ह' आढळून आला होता. योग्य उपचार व कणखर इच्छाशक्तीने त्याने दहाच दिवसांत "कोरोना'वर मात केली. आज जिल्हा रुग्णालयातून त्याला सुटी देण्यात आली. या तरुणाने सर्वांचे आभार मानत परिसरातील सर्वांनी मनोबल वाढविल्यामुळे या आजारावर मात करू शकलो, असे सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, अधिष्ठाता डॉ. एन. एस. आर्विकर, हृदयालय विभागाचे तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरूड, रुग्णालय व्यवस्थापक आशिष भिरूड, गोदावरी नर्सिंगचे प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे, मेट्रन प्रा. संकेत पाटील, प्रा. शिवा बिरादर, बांधकाम विभागप्रमुख संजय भिरूड, गोदावरी अभियांत्रिकीचे प्रमुख प्रा. एन. जी. चौधरी, हॉस्टेल रेक्‍टर प्रा. सुरेंद्र गावंडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. होस्टेलमध्ये आगमन झाले असले, तरी या तरुणास आठवडाभर विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. 

क्‍लिक कराः यावल टायगर कॉरिडोर बनलाय संवेदनशील 
 

"कोरोना वॉरियर्स'चे धाडस कौतुकास्पद : डॉ. पाटील 
या तरुण "कोरोना वॉरियर्स'ने जिद्द व धाडस दाखवत उपचार पूर्ण करून "कोरोना'वर मात केली आहे. पुढील उपचारासंदर्भात विचारपूस करून काळजी घेण्याचे सांगून हे कौतुकास्पद असून, त्याची जिद्द इतर रुग्णांसाठी, नातलगांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी प्रतिक्रिया फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon yong doctar ten dayes corona free