esakal | जामनेरच्या आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांकडून आचाऱ्याला मारहाण

बोलून बातमी शोधा

null

गृहपाल हे टवाळखोर विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत कोणताही तक्रार करीत नसल्याने या घटना वारंवार घडत असतात.

जामनेरच्या आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांकडून आचाऱ्याला मारहाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जामनेर : शहरातील आदिवासी शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी भोजन बनवून देणाऱ्या आचाऱ्यालाच अश्लील शिवीगाळ करत मारहाण केल्याचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या सर्व प्रकाराकडे अधीक्षक गृहपालाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप थेट विद्यार्थी वर्गातून होत असून गृहपालाची सखोल चौकशीची मागणी केली जात आहे.

आर्वजून पहा : अमेरिकेची लेक होतेय जळगावकरांची सून !
 

जळगाव येथील अनुश्री महिला बचत गटामार्फत शासनाच्या नियमानुसार गेल्या दोन वर्षांपासून येथील वसतिगृहातील एकूण ९८ विद्यार्थ्यांना दोन वेळचे भोजन, नाश्ता पुरविण्याचे काम सुरू आहे. परंतु येथील अधीक्षक गृहपालाचे विद्यार्थ्यांवर अंकुश नसल्याने ते वारंवार भोजन बनविणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दादागिरी करीत असून, वेळप्रसंगी शिवीगाळ व धक्काबुक्की ही करतात. असाच प्रकार काल (ता. २०) रोजी रात्री घडला. हा प्रकार घडल्यानंतर कर्मचाऱ्यांनी भोजन बनविणाऱ्या कक्षाला कुलूप लावले होते. परंतु आज (ता. २१) कर्मचारी भोजन बनविण्यासाठी केले असता, त्यांना कुलूप तोडलेले आढळले. विद्यार्थ्यांना याविषयी विचारले असता, त्यांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करून बाहेर काढले व भोजन बनविण्यास मज्जाव केला. या प्रकरणी पीतांबर माळी यांनी विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसात तक्रार अर्ज दिल्याने पोलिसांनी वसतिगृहात जाऊन विद्यार्थ्यांना समज दिली.

नक्की वाचा : गाढ झोपेत होती ती...अन्‌ असे घडले, की ती झोपेमध्येच गेली ! 

गेल्या काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. त्यावेळी सुध्दा अधीक्षक गृहपाल प्रवीण रोकडे यांना ही धक्काबुक्की करण्यात आली होती. तेव्हाही पोलिसांनी दोन्ही गटांना समज दिली होती. गृहपाल हे टवाळखोर विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत कोणताही तक्रार करीत नसल्याने या घटना वारंवार घडत असतात.

क्‍लिक कराः  आई उभी राहली...अन्‌ चिमुकला खिडकीतून झाला गायब !