मध्यान्य भोजन धान्यवाटप योजनेत जिल्ह्याची आघाडी! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

तांदूळ व डाळ वितरित करण्यात जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. सुमारे 80 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना योजनेतून लाभ मिळाला. यात सात हजार 272 क्‍विंटल तांदूळ व एक हजार 540 क्‍विंटल डाळीचे वाटप करण्यात आल्याचे शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांच्याकडून कळविण्यात आले आहे. 

जळगाव :  "कोरोना व्हायरस'च्या प्रादुर्भावात "लॉकडाउन' सुरू आहे; परंतु या काळात मध्यान्ह भोजन योजनेपासून विद्यार्थी वंचित राहू न देण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार मध्यान्ह भोजन योजनेत तांदूळ व डाळ वितरित करण्यात जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. सुमारे 80 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना योजनेतून लाभ मिळाला. यात सात हजार 272 क्‍विंटल तांदूळ व एक हजार 540 क्‍विंटल डाळीचे वाटप करण्यात आल्याचे शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांच्याकडून कळविण्यात आले आहे. 

हेपण वाचा - नवापूरच्या सीमेलगतच्या गावात अनोळखी चेहरे 
 
"कोरोना व्हायरस'वर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायययोजनेत 17 मार्चपासून शाळांना सुटी देण्यात आली. यानंतर म्हणून 22 मार्चपासून "लॉकडाउन' सुरू आहे; परंतु या काळात शालेय स्तरावरील शिल्लक तांदूळ व डाळी, कडधान्याचे विद्यार्थी- पालकांना वितरण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार शिक्षणाधिकारी बी. एस. अकलाडे यांनी शाळांना याबाबत पत्र काढून समप्रमाणात वाटपाचे आदेश काढले होते. या आदेशानुसार वाटप करण्यात आले. 

नक्‍की पहा - तक्रारीसाठी पालिकेकडून टेलिग्राम क्रमांक

एक हजार 849 शाळांत वाटप 
शाळांमधील शिल्लक तांदूळ व डाळींच्या वाटपासाठी देण्यात आलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील दोन हजार 271 पैकी एक हजार 849 शाळांना समप्रमाणात धान्यवाटप झाले. यात पहिली ते आठवीमधील तीन लाख चार हजार 115 पैकी दोन लाख 12 हजार 676 विद्यार्थी व पालकांना धान्यवाटपाचा लाभ देण्यात आला. 
 
सभापतींचा ऑनलाइन ग्रुप 
"लॉकडाउन'च्या काळात शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन व्हॉटस्‌ऍप ग्रुप तयार केला आहे. या माध्यमातून वर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण करून आगामी शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम शिकविणे, शालेय फीबाबत सक्‍ती न करणे व विद्यार्थी- पालकांना "कोरोना'संदर्भात आवश्‍यक त्या जनजागृतीपर सूचना देण्याचे काम सुरू केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jilha parishad student rice destrbute scheme jalgaon district