गावातील समस्या सोडविण्यासाठी युवकाचे थेट लोटांगण आंदोलन

जगन्नाथ पाटील 
Wednesday, 14 October 2020

विविध समस्या सोडविण्यासाठी समाधान पाटील व त्यांचे मित्र पाठपुरावा करीत असतात. मात्र ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने ते हतबल झाले आहेत. 

कापडणे : फागणे (ता.धुळे) येथे गल्ली बोळांसह मुख्य रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. इतरही समस्या निर्माण झाल्या आहेत. ग्रामपंचायत या समस्या सोडवितच नसल्याचा आरोप करीत व समस्या सोडवाव्यात यासाठी येथील युवक समाधान पाटील यांनी लोटांगण आंदोलन केले. या लक्षवेधी आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. 

आवश्य वाचा- थरारक ! भरधाव वाळूचे डंपर थेट घरात घुसले, गाढ झोपेतील दोन युवकांचा जागीच मृत्यू 

धुळे शहरापासून अवघ्या आठ दहा किमीवर फागणे हे शहरवजा गाव आहे. लोकसंख्या पंधरा हजारावर आहे. स्थानिक राजकारणामुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. विविध समस्या सोडविण्यासाठी समाधान पाटील व त्यांचे मित्र पाठपुरावा करीत असतात. मात्र ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने ते हतबल झाले आहेत. 

ते लोकप्रतिनिधी पळालेत पंचायतीतून...!
पाटील हे लोटांगण घेत पंचायतीवर येत आहेत. हे कळल्यावर पंचायतीत बसलेले काही लोक प्रतिनिधींनी पळ काढला. ग्रामविकास अधिकारी मेश्राम यांनी निवेदन स्विकारले. पण समस्या सोडविण्याबाबत कानावर हात ठेवलेत.

खुर्च्या फेक आंदोलनही झाले होत ?
विकास कामे करीत नाहीत. म्हणून येथे 'कामे करा नाहीतर खुर्च्या खाली करा' म्हणत खुर्च्या फेक आंदोलनही झाले होते. तरीही समस्या सोडविण्यास चालना न मिळाल्याने लोटांगण आंदोलन झाले.
दरम्यान या लक्षवेधी आंदोलनात गणेश चौधरी, प्रवीण गुजर, अभिजित पाटील, हरी देवरे, चंद्रकांत देवरे, योगेश देवरे आदी सहभागी झाले.

आज का पळून गेले..?
खुर्च्या फेक आंदोलन प्रसंगी आम्ही नव्हतो. म्हणून आंदोलन झाले, अशी टीका झाली होती. मग आज लोटांगण आंदोलनाला तोंड न देता, ते लोक प्रतिनिधी पळून का गेलेत. यापुढे अधिक तीव्र आंदोलन केले जाईल.
समाधान पाटील, युवा आंदोलक, फागणे
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news kapadne solve the problems in the village, the youth started a direct Lotangana agitation