esakal | धुळे, अमळनेर, शिंदखेडा तालुका तहानलेला

बोलून बातमी शोधा

panzara dam
धुळे, अमळनेर, शिंदखेडा तालुका तहानलेला
sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे : सद्या उन्हाच्या तीव्रतेने उच्चांक गाठला असून ४३ अंश सेल्सिअसपर्यंत धुळे, जळगाव जिल्ह्यात तापमान वाढले आहे. ग्रामीण भागात माणसे आणि जनावरांना पाण्याची टंचाई (Water scarcity) भासत आहे. पांझरा नदीवर अवलंबून असणाऱ्या नळपाणीपुरवठा योजनांना पाणी कमी पडत आहे. दरवर्षीप्रमाणे अक्कलपाडा धरणातून १० मे पर्यंत साडेतीनशे दशघनलक्ष पाणी सोडण्याची (release water) मागणी माजी आमदार प्रा. शरद पाटील ( sharad patil) यांनी जिल्हाधिकारी संजय यादव व धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वट्टे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (villagers demand release water from panjra river)

हेही वाचा: राज्यातील विद्यापीठ कॅम्पसमध्ये ‘तंबाखू, छेडछाडमुक्त’ अभियान

निवेदनात अक्कलपाडा धरणाखालील पांझरा पात्रात साक्री, धुळे, शिंदखेडा व अमळनेर तालुक्याच्या ८६ गावांच्या नळ पाणी योजना अवलंबून आहेत. पांझरा नदीपात्रात पाणी असल्यास या योजना सक्षमपणे चालतात. शिवाय पांझरा काठावरील ३०-३५ गावांतील पाळीव जनावरे नदी पात्रातील पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करतात. पांझरा पात्रात टंचाईच्या काळात पाणी सोडल्यास नळ पाणीपुरवठा योजना, जनावरे तसेच शेती सिंचन (Agricultural Irrigation) विहीरींनाही लाभ होतो. शिवाय पांझरेत असणाऱ्या केटीवेअर मध्ये १०-२० टक्के जलसाठा अडवून त्याचा उपयोग जूनच्या मध्यापर्यंत होतो.

पांझरा नदीचा देशात तीसरा क्रमांक

पांझरा पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाल्याने पांझरा नदी लवकर कोरडी पडते. देशातील उगमापासून ते संगमापर्यंत वेगाने पाणी वाहून नेणाऱ्या नद्यांमध्ये पांझरा नदीचा देशात तीसरा क्रमांक लागतो. उगम ते संगम असा प्रचंड उतार व पात्रात खडक असल्याने प्रचंड वहन क्षमता असणारी नदी म्हणून भौगोलिक दृष्ट्या पांझरा नदीकडे अभ्यासक पाहतात. ब्रिटिशांनी पांझरेचे हे वैशिष्ट ओळखून पांझरेवर अनेक फड पद्धतीचे बंधारे निर्माण करून नैसर्गिक दाबाने सिंचन क्षमता वाढविली आहे. याच वहन क्षमतेमुळे पांझरा लवकर कोरडी पडते. काठावरील गावांना टंचाई निर्माण होते.

हेही वाचा: आमदार कुणाल पाटलांना ‘मार्केटिंग’ची गरज नाही !

आमदारांनी केली मागणी

अक्कलपाडा धरणात सत्तर टक्के जलसाठा निर्माण करण्यात येत आहे. यांपैकी तीस टक्केच साठा उजव्या व डाव्या कालव्याद्वारे वापरात आहे. सद्या १ हजार ५०० दलघफु पेक्षा जास्त जलसाठा पांझरा पात्रात शिल्लक असल्याने यांपैकी ३५० दलघफूट जलसाठा विसर्जित करण्याची मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या वतीने माजी आमदार प्रा. पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा: आता..एसएमएसने पाठवा वीजमीटरचे रीडिंग

पाणी सोडण्याची मागणी

जलसाठा सोडण्यासाठी साक्री, धुळे, शिंदखेडा व अमळनेर तालुक्यातील तलाठी, सर्कल, सरपंचांनी पाणी सोडण्याची मागणी आपआपल्या तहसीलदारांच्या माध्यमातून पाच मेच्या आत जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे नोंदवावी, असे आवाहन प्रा. पाटील यांनी केले आहे. धरणांतील अतिरिक्त जलसाठा १५ मे अखेर विसर्जित करणे आवश्यक आहे. यंदा पावसाचा अंदाज चांगला असल्याने व धरण फक्त ७० टक्केच भरण्याची परवानगी असल्याने गेल्या वर्षासारखी पूरस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

(villagers demand release water from panjra river)