शॉटसर्किटने आग; कुटूंब थोडक्‍यात बचावले पण तीन लाख जळाले 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 3 October 2020

खलाणे येथे अनेक दिवसांपासून वीजपुरवठा कमी व जास्त प्रमाणात होत असल्याने याबाबत वीज वितरण कंपनीकडे ग्रामस्थांनी तक्रारी करून देखील त्यांनी दुर्लक्ष केल्याने सदर घटना घडली असल्याचे श्री. रूणवाल यांनी सांगितले. वारंवार विजेच्या समस्‍येमुळे उद्‌भवलेल्‍या घटनेला जबाबदार कोण?

चिमठाणे (धुळे) : खलाणे (ता.शिंदखेडा) येथे आज पहाटे दोनला संतोष रूणवाल यांच्या राहत्या घराला इलेक्ट्रिक शॉटसर्किटमुळे आग लागली. यात संसारोपयोगी सर्व वस्तू व रोख ५० हजार रूपये जळून खाक झाले आहेत. आगीत रूणवाल यांचे सुमारे तीन लाख रूपयांचे नुकसान झाले. 
खलाणे येथे अनेक दिवसांपासून वीजपुरवठा कमी व जास्त प्रमाणात होत असल्याने याबाबत वीज वितरण कंपनीकडे ग्रामस्थांनी तक्रारी करून देखील त्यांनी दुर्लक्ष केल्याने सदर घटना घडली असल्याचे श्री. रूणवाल यांनी सांगितले. वारंवार विजेच्या समस्‍येमुळे उद्‌भवलेल्‍या घटनेला जबाबदार कोण? हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळेच घराला आग लागल्याची रूणवाल यांनी आरोप केला. वीज वितरण कंपनीने फक्त तक्रारीची दखल न घेतल्याने नाहक घर जळाले असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिल्या. 

परिवार बचावला
रूणवाल कुटुंबातील सर्व सदस्य झोपले होते. रात्री दोन वाजेच्या सुमारास किचनमधून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याने त्यांना जाग आली. परिवारातील सर्व सदस्‍य उठून बाहेर पडाले. त्यांनी गल्लीत आवाज दिल्‍यानंतर गल्लीतील लोकांनी आग विझवण्याची मदत केली. आगीने उपद्रवामुळे संपूर्ण घरातील संसारपयोगी वस्तु आणि ५० हजार रूपये रोख जळून सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news khalane village shotcurcit fire in house late night