सावद्यातून दुबई, इराणला केळी रवाना.. परदेशातून मागणीत वाढ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 मे 2020

मजुरांच्या स्थलांतरास तसेच केळी वाहतुकीस लॉकडाउनमुळे परवानगी मिळत नसल्याने केळी निर्यात थंडावली होती. यामुळे लॉकडाउन कालावधीत कंपनीने दिल्ली येथे ३० मेट्रिक टन केळी पाठवली.

सावदा  : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांचे केळी निर्यात सुविधा केंद्र सावदा येथून सद्‌गुरू इंटरप्रायजेस ठाणे, मुंबई यांच्यातर्फे दुबई, इराण या देशात ४० मेट्रिक टन केळीची निर्यात करण्यात आली आहे. परदेशातून २५ कंटनेरची मागणी वाढली आहे. या केंद्रातून या आठवड्यात ३ कंटेनर माल वातानुकूलित करून, रवाना होणार आहे. अशी माहिती देण्यात आली. 

नक्की वाचा :  भुसावळमध्ये पुन्हा दोन कोरोणा पॉझिटिव्ह 
 

देशात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांचा शेतमाल विक्री करताना अनेक अडचणी भेडसावत आहेत. शेतकऱ्यांचे यामुळे मोठे नुकसान होत असल्याचे ध्यानात आल्यानंतर कृषी पणन मंडळ, अपेडा व स्थानिक प्रशासनाच्या मागदर्शनाने दुबई व इराण या देशामध्ये निर्यात केली आहे. केळीची काढणी व ग्रेडींग प्रत्येकी १३ किलो पॅकिंग बॉक्स मध्ये भरून सुविधा केंद्रावर वातानुकूलित करून कंटेनर भरला जातो. यात १५४० बॉक्स (२० मेट्रिक टन) केळी मुंबई येथे कंटेनरनेपाठवली जाते. तेथून जहाजाने मार्ग दुबई व इराण या देशात पाठवत आहे. केळी निर्यातीसाठी काढणी, ग्रेडींग पॅकिंग व वाहतुकीसाठी मजुरांची आवश्यकता असते. तथापि मजुरांच्या स्थलांतरास तसेच केळी वाहतुकीस लॉकडाउनमुळे परवानगी मिळत नसल्याने केळी निर्यात थंडावली होती. यामुळे लॉकडाउन कालावधीत कंपनीने दिल्ली येथे ३० मेट्रिक टन केळी पाठवली. सतगुरू इंटरप्रायजेस कंपनीच्या संचालक प्रांजली नारकर, निर्यातदार प्रशांत नारकर यांना महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, अपेडाचे प्रशांत वाघमारे यांचे मार्गदर्शन मिळाले. 

क्‍लिक कराः उन्हातान्हात लाठी खात मिळवली बाटली ;तळीरामांनी लावल्या लांबच लांब रांगा 
 

सात रुपये किलो दर 
सध्या लॉकडाउन मुळे स्थानिक बाजारपेठेत केळीचे दर २ते ३ रुपये प्रति किलोपर्यंत खाली आलेले आहेत. सतगुरू एंटरप्रायजेसच्या माध्यमातून केळी उत्पादकांना ७ ते ८ रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. कंपनीचे निर्यातदार प्रशांत नारकर, व्यवस्थापक विश्वपाल मोरे व रोखपाल संकेतीका जोरे यांनी अपेडा, कृषी, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे व स्थानिक प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली लॉकडाउन काळात काम करत आहे. अशी माहिती पॅक हाऊसचे व्यवस्थापक विश्वपाल मोरे यांनी दिली. 

आर्वजून पहा : रईसजाद्यांना मद्याची खरेदी भोवली ;29 लाखांची गाडीत 37 हजारांची दारु जप्त 
 

हिंगोणा येथील केळी विदेशात रवाना 
हिंगोणा (ता. यावल) ः हिंगोणा येथील प्रगतिशील शेतकरी चंद्रकांत खुशाल महाजन यांनी उच्च प्रतीची केळी विदेशात आज रवाना केली त्यांची उच्च प्रतीची केळी इराण येथे आज एक्स्पोर्ट करण्यात आली. यावेळी चंद्रकांत महाजन, बंटी पाटील, मनोज वायकोळे, पप्पू राजपूत बापू पाटील आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sawda Demand from abroad increases Bananas shipped to Dubai, Iran