विधानसभा अध्यक्ष सौंदाणेचे  व्याही होण्याची शक्यता? आले अन मुलीसाठी निमंत्रण देवून गेले

live
live

सौंदाणे : गाव व परीसरात आज शुक्रवारी दिवसभर एकच चर्चा सुरु होती. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले सौंदाणे दौऱ्यावर येणार हे काल वृत्तपत्रातून अनेकांना समजले. पण ते येथे येणार कुठे? असा प्रश्न सर्व ग्रामस्थांसह जिल्ह्यातील नेते, कार्यकर्त्यांना भेडसावत होता. सर्वांची उत्कंठा शिगेला पोहचली होती. दुपारी बाराला गावात त्यांचे आगमन झाले. ते थेट जिल्हा परिषद शिक्षक नंदलाल पवार यांच्या निवासस्थानी गेले अन या कौटुंबिक दौऱ्याचा खुलासा झाला. तो म्हणजे श्री. पटोले येथील श्री. पवार यांचे व्याही होण्याची शक्यता असल्याचा. श्री. पटोले आले अन मुलीसाठी निमंत्रण देवून गेले. याचीच चर्चा आता सुरु आहे.

निमंत्रण दिले

नंदलाल पवार यांचा मुलगा तेजस पवार हा गेल्या वर्षी (२०१८) केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. आयएएससाठी त्याची निवड झाली आहे. सध्या तेलंगणामध्ये तेजसचे प्रशिक्षण सुरु आहे. श्री. पटोले यांनी नंदलाल पवार यांच्या घरी सदिच्छा भेट देतानाच मुलीसाठी निमंत्रण देऊन गेले. श्री. पटोले यांची कन्या व तेजस यांचा विवाह निश्‍चित झाल्यास नवल वाटू नये. उद्या शनिवारी (ता.१४) पवार कुटुंबिय व त्यांचे मोजके नातेवाईक मुंबई येथे मुलीला पाहण्यासाठी जाणार असल्याचे समजते.

आणि वाटचालीस शुभेच्छा

श्री. पटोले यांनी येथे भेट दिली असता त्यांनी श्री. पवार व तेजस यांचा सत्कार करून अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पवार कुटुंबियांतर्फे श्री. पटोले विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष झाल्याबद्दल नंदलाल पवार यांनीही त्यांचा सत्कार केला. भोजन व अन्य कौटुंबिक कार्यक्रम आटोपल्यानंतर श्री. पटोले दुपारी तीनच्या सुमारास मनमाडच्या दिशेने निघाले. शहर व तालुक्यात आज त्यांच्या या भेटीचीच सर्वत्र चर्चा होती. तत्पुर्वी दुपारी आमदार दादा भुसे यांनी मनमाड चौफुलीवर श्री. पटाेले यांचे स्वागत केले. यानंतर त्यांनी कै. डॉ. बळीराम हिरे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते सौंदाणे रवाना झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com