महाराणाप्रताप राजवंशाची नाळ सांगणारा अक्रानी महल !

राजू शिंदे
Tuesday, 29 September 2020

महाराणा प्रतापांची बहीण ‘अक्काराणी’सह काही स्वामीनिष्ठ राजपुतांनी आपला वंश, धर्म सुरक्षित ठेवण्यासाठी सातपुड्यातील या भागाचा आश्रय घेतला.

ब्राम्हणपुरी : धडगाव तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेत ऐतिहासिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. या महलाला पाचशे वर्षाचा इतिहास असून याची नाळ राजपूतांशी संबधीत आहे. आक्रानी महल या वास्तू मधून राजपूतांची गौरवशाली इतिहास तसेच संस्कृतीची ओळख होत असली तरी सद्या या महलाची अवस्था अतिशय जीर्ण झाली आहे. त्यामुळे  ही वास्तू पडण्याच्या अवस्थेत असून शेवटची घटका घेत आहे.

वाचा- नंदुरबार जिल्हा : अतिवृष्टीने १५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

धडगावपासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर सापपुड्यांच्या जंगलाच्या कुशीत या महालाचे अवशेष आपणास मिळतात. हा जीर्ण झालेला महल त्वरित दुरुस्ती करा अशी मागणी बिरसा क्रांती दल च्या माध्यमातून करण्यात आली असून याबाबत धडगाव तहसीलदार यांना बिरसा क्रांतिदल निवेदन दिले आहे. 

महलला पाचशे वर्षाचा इतिहास
भारत वर्ष व ब्रिटिश काळाच्या पूर्वीपासून थेट राजस्थान पर्यंत पाचशे वर्षाचा इतिहासाचा बुलंद साक्षीदार असलेला हा अक्रानी महल आहे. या महलावर पूर्वी अक्काराणी नामक स्वामिनिष्ठ राजपूत सुभेदारणीचे वास्तव्य असलेल्या खुनाची स्पष्ट बोलकी करणारी सुबक आकर्षक आणि नक्षीदार देवळी (राणी काजल माता) अद्यापही मिरवत आहेत.

आवश्य वाचा- रहस्‍यमय..जंगलातील धबधब्‍यावर गेले; युवक अचानक झाला गायब

अक्काराणी या महाराणा प्रतापांची बहिण

हळदी घाटाच्या मुस्लिमांसोबत झालेल्या युद्धात राणा प्रतापचा पराभव झाला. त्या वेळी मुस्लिमांच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी महाराणा प्रतापांची बहीण ‘अक्काराणी’सह काही स्वामीनिष्ठ राजपुतांनी आपला वंश, धर्म सुरक्षित ठेवण्यासाठी सातपुड्यातील या भागाचा आश्रय घेतल्याचे प्रसिद्ध इतिहास संशोधक एल. के. भारतीया यांच्या शोधनिबंधात लिहिले आहे. 
 

महाराणा प्रतापा यांचा राजवंशाची नाळ

महाराणांप्रताप यांच्या राजवंशाशी असलेली नाळ सांगणाऱ्या पुण्यपावन असलेल्या हा अक्रानी महल आहे. महलाला सातपुड्याच्या पर्वतांने भक्कम मजबुती प्रदान केली आहे.

 

महलाचे अस्तित्व धोक्यात

जीर्ण होत असून एक महत्वाचा ऐतिहासिक पुसला जात आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने इतिहास साक्षी असलेल्या वास्तू चे अस्तित्व धोक्यात आले असून यास संरक्षण करून याची दुरुस्ती करावि अशी मागणी बिरसा क्रांतिदल यांच्या मार्फत करण्यात येत आहे. या संबंधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री ,पर्यटन मंत्री व आदिवासी विकास मंत्री यांना ई-मेल द्वारे निवेदन पाठवण्यात आले आहे. तसेच धडगाव तहसीलदार यांना निवेदन देऊन दुरुस्तीची मागणी करण्यात आली यावेळी बिरसा क्रांतीदलाचे जिल्हा अध्यक्ष रोहित पावरा व धडगाव बिरसा क्रांती दलाचे पदाधिकारी प्रितेश पावरा, सचिन पावरा, सचिन शिंदे,

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Akrani Mahal, which tells the history of Maharana Pratap's dynasty, is in dilapidated condition