अनेकांचे प्राण वाचविणाऱ्या चालकाला हेरले कोरोनाने; पंधरावर्षीय मुलीचाही समावेश 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 April 2020

शहादा आणि अक्कलकुवा येथील प्रत्येकी एका जणांचा समावेश आहे. यामध्ये एक पंधरा वर्षीय मुलगी तर गेल्या महिनाभरापासून रूग्णवाहिकेतून रूग्णांना नेण्याचे काम करणाऱ्या अक्‍कलकुवा येथील चालकाचा समावेश आहे. 

नंदुरबार ः कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना फायटर म्हणून रूग्णांची ने- आण करणाऱ्या चालकाला देखील कोरोना व्हायरसने जखळले. कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या महिलेला रूग्णवाहिकेतून घेवून गेल्यानंतर त्यास कोरोनाची लागण झाल्याचे आज प्राप्त अहवालातून समोर आले. यासह एक पंधरा वर्षीय मुलीला देखील कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. 

आवर्जून वाचा - दोन दिवसांवर विवाह अन्‌ तिच्याबाबतीत घडले अघटीतच 

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यात आज आणखी दोन जणांची भर पडली असून कोरोना बधितांची संख्या आता 13 झाली आहे. यात शहादा आणि अक्कलकुवा येथील प्रत्येकी एका जणांचा समावेश आहे. यामध्ये एक पंधरा वर्षीय मुलगी तर गेल्या महिनाभरापासून रूग्णवाहिकेतून रूग्णांना नेण्याचे काम करणाऱ्या अक्‍कलकुवा येथील चालकाचा समावेश आहे. 

क्‍लिक करा - अगोदर दिली धमकी मग रात्री संधी साधत क्‍वारंटाईन केलेल्या युवकांनी केले भलतेच 
 

दोघे कोरोना बांधीतांच्या संपर्कात 
नंदुरबार जिल्हा प्रशासनाला आज प्राप्त झालेल्या अहवालात अक्कलकुवा येथील 58 वर्षाचा पुरुष असून तो कोरोनाबधित महिलेच्या संपर्कात आला होता. तर दुसरा पॉझिटीव्ह शहाद्यातील पंधरा वर्षीय मुलगी आहे. ती आधीचा रुग्ण असलेल्या गरीब नवाज कॉलनी परिसरातील असून तीही दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात अली होती. दरम्यान आज 52 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar ambulance driver and girl corona positive