निवडणूक स्थगित करण्यासाठी प्रयत्न : खासदार रक्षा खडसे

निवडणूक स्थगित करण्यासाठी प्रयत्न : खासदार रक्षा खडसे
raksha khadse
raksha khadseraksha khadse

तळोदा (नंदुरबार) : राज्य शासनाने लक्ष न दिल्याने ओबीसींचे आरक्षण गेले असून, आज त्याच शासनाचे मंत्री त्यासाठी आंदोलन करीत आहेत, ते मंत्री नागरिकांची दिशाभूल करीत ढोंग करीत आहेत. मराठा आरक्षणाबाबतही शासनाने तेच केले असून, सरकार ओबीसी, मराठा, आदिवासी समाजावर अन्याय करीत आहे. भाजप आरक्षणासंदर्भात कोर्टात जाणार आहे, तसेच याबाबत कोर्टाचा निकाल लागेपर्यंत जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुका स्थगित व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे प्रतिपादन खासदार रक्षा खडसे यांनी केले. (nandurbar-bjp-meet-mp-raksha-khadse-zp-election)

भाजपच्या जिल्हा कार्य समितीची बैठक आदिवासी भवनात झाली. त्यात त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, संघटनमंत्री रवी अनासपुरे, खासदार डॉ. हीना गावित, आमदार राजेश पाडवी, सातपुडा कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील, नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, प्रदेश सदस्य राजेंद्रकुमार गावित, माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, तालुकाध्यक्ष भरत गावित, सरचिटणीस राजेंद्र गावित, तालुकाध्यक्ष बळिराम पाडवी, अनिमिका चौधरी, नीलेश माळी, यशवंत ठाकरे, नगरसेवक हेमलाल मगरे, अमोनोद्दीन शेख, रामानंद ठाकरे, नगरसेविका अंबिका शेंडे, स्वप्नील बैसाणे, एजाज शेख, प्रदीप शेंडे, कैलास चौधरी, जगदीश चौधरी आदी उपस्थित होते.

raksha khadse
निवडणुकीवर भरारी पथके, व्हिडिओचा वॉच

अनासपुरे म्हणाले, की महाराष्ट्र शासनावर युवक मोठ्या प्रमाणावर नाराज असून, शासनाने नोकरीचा खेळखंडोबा केला आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना केल्या. मात्र राज्य शासनाने या काळात नागरिकांसाठी काहीही केले नाही. चौधरी यांनी सांगितले, की ‘भाजप आपला उमेदवार, कमळ आपलं चिन्ह व प्रत्येक व्यक्ती हा जिल्हाध्यक्ष’ यानुसार भाजपाची वाटचाल सुरू आहे. आमदार राजेश पाडवी, खासदार डॉ. हीना गावित यांनी मनोगत व्यक्त केले.

निम्म्या नगरसेवकांची दांडी

रक्षा खडसे, संघटनमंत्री, खासदार, जिल्हाध्यक्ष शहरात पक्षाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला आले असता, या वेळी जवळपास निम्म्याच्या आसपास नगरसेवकांनी दांडी मारली होती. वास्तविक भाजपची शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळख आहे. याअगोदरही अनेक कार्यक्रमांना विद्यमान नगरसेवक दांडी मारत आले आहेत. मात्र आजच्या कार्यक्रमाला नगरसेवकांच्या अनुपस्थितीबाबत कार्यक्रमस्थळी एकच चर्चा सुरू होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com