esakal | ब्राम्हणपुरी: ट्रक,पिकप गाडीचा भिषण अपघात; एकाचा मृत्यू, २ जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

ब्राम्हणपुरी: ट्रक,पिकप गाडीचा भिषण अपघात; एकाचा मृत्यू, २ जखमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ब्राम्हणपुरी : शहादा खेतीया रस्त्यावर ब्राम्हणपुरी गावाजवळ आयशर ट्रक (Truk) ओव्हरटेक करीत असतांना समोरुन येणाऱ्या पिकप (Pikup Van) गाडीस जोरदार धडक (Accident) दिली. यात एक जागीच ठार (Death) तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ ग्रामस्थांनी म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ब्राह्मणपुरी (ता. शहादा) गावानजीक हा अपघात घडला. अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

हेही वाचा: आजीबाईंना दत्तक घेऊन नातींनी हाती दिली सरस्वती

मिळालेल्या माहितीनुसार, शहादयाकडून खेतिया मध्यप्रदेशकडे हिरवी मिरची भरून जाणारी आयशर ट्रक क्रमांक ( एम. एच.१८,बीजी.- ७७५९) ब्राम्हणपुरी गावाजवळ ओव्हरटेक करीत असतांना त्याच दरम्यान खेतियाकडून शहादयाकडे मिरची भरुन येणाऱ्या पिकप वाहन क्रमांक( एम. पी. जी.२३०५ ) ला जोरदार धडक दिली. अपघाताची भीषणता मोठी होती. यात दोन्ही गाड्यांच्या चालकाच्या केबिनच्या चक्काचूर झाला.

Accident

Accident

हेही वाचा: धुळे: कपाशी पिकावर लाल्या सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव

अपघातात आयशर ट्रक चालक कपिल बाबूलाल गंगवाल (रा.बडीथाना ता.राजपुर जि. बडवाणी,मध्यप्रदेश) याच्या जागीच मृत्यू झाला.तर पिकअप चालक व क्लीनर प्रविण करसन यादव ( वय २८,रा.रामपुरा ता. कसरावद जि. खरगोन, मध्यप्रदेश), लवकुश रामकरन यादव (वय ३०,रा.नवलपुरा ता. खरगोन,मध्यप्रदेश)दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ ब्राम्हणपुरी येथील ग्रामस्थांनी म्हसावद ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक निलेश वाघ यांसह कर्मचाऱ्यांनी भेट दिली.दरम्यान जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

loading image
go to top