esakal | नंदुरबार शहरातील कोणते रस्ते आहेत बंद आणि कोणते सुरू जाणून घ्या...
sakal

बोलून बातमी शोधा

nandurbar

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना संसर्गाची संख्या ६८ वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या आठवडाभरापासून दररोज रुग्ण वाढतच आहेत. अनेक रुग्णांच्या प्रवासाचा इतिहास 'हायरिक्स' भागातील असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विषाणूच्या अधिक प्रसार होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.

नंदुरबार शहरातील कोणते रस्ते आहेत बंद आणि कोणते सुरू जाणून घ्या...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : कोरोना संसर्गाच्या रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन अखेर जिल्हा प्रशासनाने पुन्हा कठोर पाऊल उचलले आहे.रात्री बारा पासून पुन्हा चार दिवस जीवनावश्‍यक वस्तूंसाठी सकाळी चार तासाची शिथिलता वगळता सर्वच प्रतिष्ठाने व व्यवहारा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. दुपारी बारानंतर रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. दुपारी बारानंतर शहरातील रस्त्यांवर स्मशान शांतता दिसून आली. दरम्यान, शहरातील मुख्य प्रवेशद्वारासह मुख्य रस्त्यांवर बॅरिकेटींग करून रस्ते सील करण्यात आले आहेत. 

आवर्जून वाचा - सुरक्षित गावाला बाहेरून आलेल्या व्यक्तीमुळे बाधा; ३२ जण क्वॉरंटाईन

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना संसर्गाची संख्या ६८ वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या आठवडाभरापासून दररोज रुग्ण वाढतच आहेत. अनेक रुग्णांच्या प्रवासाचा इतिहास 'हायरिक्स' भागातील असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विषाणूच्या अधिक प्रसार होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. तरीही नागरिकांकडून मात्र दुर्लक्षच केले जात आहे. शहरात सापडलेले रूग्ण हे बाहेरील मोठ्या शहरांमधून आल्याचे आतापर्यंत चा रूग्णांचा ट्रॅव्हेल हिस्ट्रीवरून दिसून आले आहे. प्रशासनाने दिलेल्या शिथिलतेचा फायदा घेत अनेकजण मुंबई, पुणे, कल्याण तसेच गुजरातमधील मोठ्या शहरांमध्ये जा - ये करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रिस्क वाढली आहे. प्रशासनानेही नागरिक गांभीर्याने घेत नसल्याने हात टेकले होते. मात्र त्यामुळे अधिकच नागरिक बिनधास्त झाले होते. हे लक्षात घेऊन प्रशासनाने पुन्हा कठोर धोरण घेऊन १९ जूनपर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 
त्याचाच एक भाग म्हणून शहरात बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली आहे. अनावश्‍यक वाहने शहरात येऊन गर्दी होऊ नये म्हणून धुळे चौफुलीवरील मुख्य प्रवेशद्वारालाही बॅरिकेटीग करून बंद करण्यात आलेला आहे. त्याच प्रमाणे जाणता राजा चौक, महेश स्तंभ चौक, सी.बी पेट्रोल पंप परिसर, संत सेना चौक, करण चौफुली, धानोरा रस्त्यावर बॅरिकॅडींग करण्यात आलेले आहे. जेणेकरून वाहनांना प्रवेश करता येणार नाही व गर्दी कमी होण्यास मदत होईल. नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे 

दुपारी स्मशान शांतता 
आज सकाळी अकरापासूनच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना हटकत होते. त्यामुळे दुपारी बारापर्यंत पूर्ण शहरात शुकशुकाट पसरला होता. चौकाचौकात पोलिसांचेच अधिराज्य दिसून आले.बारानंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. 
 

loading image