esakal | शिक्षकांच्या अधिवेशनात कोरोना नियमांचा फज्जा
sakal

बोलून बातमी शोधा

Teachers Association

शिक्षकांच्या अधिवेशनात कोरोना नियमांचा फज्जा

sakal_logo
By
धनराज माळीनंदुरबार :
जिल्ह्यात प्रशासन एकीकडे विविध कार्यक्रमांवर निर्बंध घालून जनतेला कोरोनाच्या (Corona Ruls) संकटापासून वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कोरोना काळात फ्रंटलाइन वर्करर्सने जीव धोक्यात घालून कोरोना योद्धा म्हणून भूमिका बजावली, त्याच काळात कोरोनाविषयी व त्यानंतर लसीकरणाविषयी (Vaccination) जनजागृती करणारे शिक्षक बांधवांनीही जीव धोक्यात घालून सेवा बजावली. त्यातीलच एका शिक्षक संघटनेला (Teachers Association) त्या महाभयंकर परिस्थितीचा विसर पडल्याचे चित्र रविवारी दिसून आले.

हेही वाचा: राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींना टपालाने पाठविल्या गोवऱ्या


शिक्षक म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्त्व समजले जाते. मात्र काही हेकेखोर स्वयंघोषित नेते समजणाऱ्या लोकांमुळे सुरक्षित अंतराचा फज्जा उडवून हजारोंच्या गर्दीत शिक्षकांचे अधिवेशन भरविले. हे अधिवेशन म्हणजे कोरोनाला निमंत्रण देण्यासाठीच होते की काय, असा प्रश्‍न जिल्हा वासीयांमध्ये उपस्थित केला जात आहे. त्यामुळे धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांवर निर्बंध घालणारे प्रशासन आता काय कारवाई करते? याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे.
एकीकडे पाच दिवसांवर आलेला गणेश उत्सवही साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मनिषा खत्री व लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता.४) झालेल्या बैठकीत केले आहे. मात्र या आवाहनाला एक दिवसही उलटत नाही तोच एका शिक्षक संघटनेने तळोदा रस्त्यावरील खुल्या मैदानावर मोठा मंडप टाकून थाटामाटात हजारो शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व नेत्यांना निमंत्रित करीत शिक्षक अधिवेशन भरविले.


अधिवेशनाचा उद्देश काहीही असो, मात्र सध्याचा कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता हजारोंच्या संख्येने उपस्थित लोकांचा जिवाला नक्कीच धोका निर्माण करणारे ठरणार आहे. या अधिवेशनात कुठेही फिजिकल डिस्टन्स दिसून आले नाही. एवढेच काय तर अनेकांचा तोंडावर मास्क नव्हते. काहींकडे मास्क होते तर ते हनुवटीवर लावलेले होते. कार्यक्रमस्थळी सॅनिटायझरची व्यवस्था नव्हती. तासनतास कार्यक्रम चालल्यानंतर पुन्हा भोजनाची व्यवस्था होती. तेथे गर्दी झाली होती. त्यामुळे प्रशासनाच्या नियमांचा फज्जा उडाला होता.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात..एका दिवसात लाखावर लसीकरण


एकीकडे प्रशासन रस्त्यांवर विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करते. त्यांचा हेतू खरोखरच चांगला असतो. लोकांचा जीव वाचविण्यासाठी त्यांना कठोर पावले उचलावी लागतात. त्यावेळी पोलिसांवर रोष व्यक्त केला जातो.मात्र बिनधास्तपणे एवढी गर्दी जमवून नियमांची पायमल्ली करण्याचे धाडस करणारा शिक्षक कम स्वतःला मोठा नेता समजणारा तो नेता कोण? त्याला एवढे अभय कोणाचे? त्याची एवढी मुजोरी वाढली कशी, माध्यमांनाही कमी लेखणाऱ्या त्या तथाकथित पदाधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया जनमानसातून उमटू लागल्या आहेत.

loading image
go to top