esakal | गाव बंद ठेवून वरुणराजाला साकडे
sakal

बोलून बातमी शोधा

गाव बंद ठेवून वरुणराजाला साकडे

गाव बंद ठेवून वरुणराजाला साकडे

sakal_logo
By
टीम ई सकाळ


खापर : जुलै महिना निम्‍मा उलटला तरीही पाऊस (Rain) नाही, त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी (Farmers) हलक्या स्वरूपात पाऊस झाल्यावर पेरण्या केल्या होत्या, तर काहींना अद्यापही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. ज्यांनी पेरण्या (Sowing) केल्या त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट (Sowing crisis) आले आहे. यामुळे आता पावसाअभावी शेतकरी आणि ग्रामस्थ (Villagers) हतबल झाले आहेत. खापर ग्रामस्थांनी वरुणराजाला साकडे घालण्याची पारंपरिक (Traditional) प्रथेनुसार सर्व जाती, धर्माच्या सहमतीने व आदिवासी (Tribal) समाज पंचांतर्फे गुरुवारी घरात चुली न पेटविता गाव बंद ठेवून गावाबाहेर विधिवत पूजा करून निसर्गदेवतेला साकडे घातले. (nandurbar district khapar village to rain dhnodi removed)

हेही वाचा: महामार्गावरील या ढाब्यांवर नक्की जा आणि जेवणाचा आनंद घ्या

हवामान विभागाने यंदा १५ जूनपर्यंत समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र हा अंदाज फोल ठरवत जुलै अर्धा उलटला असतानाही अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थ हतबल झाले आहेत. अनेकांकडून हलक्या पावसात पेरण्या केल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. काहींना दुबार पेरणी करावी लागणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घेतलेले महागडे बियाणे घरातच पडून आहे. अद्यापही शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र पाऊसच न झाल्याने आता पावसाची ठिकठिकाणी आळवणी करण्यात येत आहे. अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे वरुणराजाला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. पावसाचे आगमन व्हावे, सर्वत्र समृद्धी नांदावी यासाठी खापर ग्रामस्थांची गावाबाहेर निघण्याची प्रथा आहे. त्यानुसार संपूर्ण खापर गाव गुरुवारी (ता. १५) बंद ठेवले, घरात चुली न पेटविता गावाबाहेर विधिवत पूजा करत ग्रामस्थांकडून पारंपरिक वाद्य, भजनी मंडळ, आदिवासी नृत्य करत वरुणराजाला साकडे घालण्यात आले.

हेही वाचा: बैलगाडीसह शेतकरी दांपत्य नाल्याच्या पुरात गेले वाहून


पाऊस जर वेळेवर आला नाही तर वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी खापर गावातील सर्व जाती-धर्मांच्या सहमतीने एक दिवस गावाबाहेर निघण्याची प्रथा आहे. त्यानुसार आज ग्रामस्थ घरी चूल न पेटविता गावाबाहेर थांबून आदिवासी पंचांतर्फे विधिवत पूजा करण्यात आली.
-विनोद कामे, उपसरपंच, खापर

loading image