esakal | कमी किंमतीत सोने घ्या.. सोने घ्या म्हणत हेरायचे अन्‌ 
sakal

बोलून बातमी शोधा

gold froad

कमी किंमतीत सोने घ्या.. सोने घ्या म्हणत हेरायचे अन्‌ 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : जंगलात जडीबुटी गोळा करताना सोन्याचा हंडा सापडला असून ते कमी किंमतीत विकायचे आहे; असे सांगत अस्सल सोने दाखवत देताना नकली सोने देत फसवणूक करणाऱ्या टोळीचा नंदुरबार जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने लावला आहे. सहज कोणताही नंबर फिरवायचा, प्रतिसाद मिळाला की त्याला गुंतवत सोन्याचे आमिष दाखवायचे आणि फसवणूक करायची असा या टोळीचा फंडा होता. विशेष म्हणजे हे तिघे बेकार असून विशीतील आहेत. 

हेपण वाचा - सावधान इंडिया, "क्राईम पेट्रोल'च्या प्रभावातून आर्शिनचा बळी


जामदा (ता.साक्री) येथील असून गुन्हा धुळे जिल्ह्याच्या हद्दीत घडलेला असून येथील एलसीबीने त्याचा छडा लावल्याने पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी टीमचे अभिनंदन केले आहे. बैलखेडा (ता. सोयगाव, जि. अक्कलकुवा) येथील राहुल रोहिदास राठोड यांना टोळीने मोबाईलवरून संपर्क करत कमी किंमतीत सोने विकायचे आहे; असे सांगून आमिष दाखविले. त्यांना नंदुरबारजवळील छडवेल येथे बोलविले. राठोड यांनी जळगांव येथे सॅम्पलची खात्री केली. गजाननने एक हजार रूपये प्रति ग्रॅम भावाने सोने देण्याचे मान्य केले. 
त्यानंतर तक्रारदार, त्यांचे वडिल जळगाव येथील अनिल सोनार असे खासगी गाडीने छडवेलजवळील पेटलावाडी येथे सोनाराला सोबत घेऊन आले. सॅम्पलची सोनाराने खात्री करून ते सोनेच असल्याचे सांगितले. त्यामुळे तक्रारदारांनी 4 लाख 90 हजार रुपये देऊन सोन्याच्या बांगड्या असलेली पिशवी संशयित गजानन यांच्याकडून घेतली. घरी आल्यानंतर तपासणीत त्या नकली असल्याचे दिसून आले. 

तक्रारदार राहुल राठोड यांनी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना भेटून हकिकत कथन केली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी एक पथक तयार करुन मार्गदर्शन केले. तक्रारदाराने दिलेला संशयित गजाननचा मोबाईल नंबरवरून तो शहरातील जिजामाता कॉलेज परिसरात असल्याचे लक्ष्यात येताच पथकाने धाव घेत बजाज ऑटो शोरुमजवळ तिघांना पकडले. 
संशयितांनी नकली सोने दिल्याची कबुली दिली. नकली सोन्याच्या बांगड्यांनी भरलेली कापडी पिशवी जप्त करुन आरोपी व मुद्देमाल निजामपुर जिल्हा धुळे यांचे ताब्यात देण्यात आलेला आहे. ही कारवाई श्री. नवले यांच्या मार्गदर्शनानुसार हेड कॉन्स्टेबल सजन वाघ, पोलिस नाईक बापू बागूल, विशाल नागरे, पोलिस शिपाई मोहन ढमढेरे, अभय राजपुत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी संपुर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे. 

अशी निघाली गुन्ह्यांची पध्दत 
ताब्यात घेतलेल्यांनी त्यांची नावे गजानन ऊर्फ कल्पेश्‌ ऊर्फ जानी संतोष भोसले (वय 23), प्रभू सवसारी चव्हाण (वय 19) लुकेश मुकेश पवार (वय 20) सर्व रा जामदा (ता. साक्री, जि. धुळे) अशी सांगितली. गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपासात त्यांनी अतिशय धक्कादायक माहिती सांगितली. संशयीत मुळचा जामदा येथील असून काही एक काम धंदा करीत नाही. दिवसभरात मोबाईलद्वारे सहज नंबर डायल करुन अनोळखी व्यक्तींशी संपर्क करुन त्यांना आपल्या जाळ्यात अडकवत असे. तसाच राहुल राठोड हा देखील जाळ्यात अडकला होता. 

पोलिसांचे नागरिकांना आवाहन 
सोन्याचे दागिने भरलेला हंडा खोदकाम करीत असतांना सापडलेला आहे किंवा नागमनी, जादूचा ग्लास तसेच भारतीय चलनी नोटा पैसे दुप्पट करुन देणे इत्यादीबाबत फोन आल्यास किंवा संशयिताबाबत माहिती मिळाल्यास त्वरित पोलिस नियंत्रण कक्ष (02564 -210100, 210113) व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी केली आहे.