esakal | वाईट प्रवृत्ती विरोधात लढण्याचे सामर्थ्य निर्माण करा ः राज्यपाल कोश्‍यारी 
sakal

बोलून बातमी शोधा

Governor Bhagat Singh Koshari

महिला अत्याचाराच्या घटना वेदनादायी आहेत. केवळ पोलिस दल त्या रोखू शकणार नाही. ही सामाजिक समस्या असल्याने सामाजिक जागृतीद्वारे या समस्येवर मात करता येईल

वाईट प्रवृत्ती विरोधात लढण्याचे सामर्थ्य निर्माण करा ः राज्यपाल कोश्‍यारी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : महिलांवरील अत्याचार दूर करण्यासाठी महिला सक्षमीकरणासोबत पुरुषांच्या मनात महिलांविषयी सन्मानाची भावना निर्माण होणे गरजेचे आहे. हिंगणघटसारख्या प्रकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी समाजातील वाईट प्रवृत्तींविरोधात लढण्याचे सामर्थ्य युवकांनी आपल्यामध्ये निर्माण करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्‍यारी यांनी केले. 

ते नंदुरबार तालुका विधायक समिती संचालित विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते. कार्यक्रमाला खासदार हिना गावित, राजभवनाचे प्रधान सचिव संतोष कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वसुमना पंत, बार कौन्सिल सदस्य जयंत जायभावे, संस्थेचे संचालक परवेझ खान, प्राचार्य एन.डी. चौधरी आदी उपस्थित होते. 

आर्वजून पहा : दुर्दैवी दुर्घटना...! सुटले नियंत्रण अन्‌ कोसळले पन्नास फुट खोल दरीत 
 

रुची वळवीच्या प्रश्नाला उत्तर देताना श्री.कोश्‍यारी म्हणाले, महिला अत्याचाराच्या घटना वेदनादायी आहेत. केवळ पोलिस दल त्या रोखू शकणार नाही. ही सामाजिक समस्या असल्याने सामाजिक जागृतीद्वारे या समस्येवर मात करता येईल. विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा. कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. दुर्गम भागात पोषणयुक्त आहार देण्यात येत आहे. काही कालावधीनंतर या समस्येवर मात करता येईल, असे त्यांनी धिरसिंग पाडवी याच्या प्रश्नास उत्तर देताना सांगितले. यानंतर राज्यपाल कोश्‍यारी यांनी सेंट्रल किचनला भेट दिली. तेथील व्यवस्थेची माहिती घेऊन त्यांनी समाधान व्यक्त केले. 

नक्की वाचा :मर्यादित चौपदरीकरणाने अपघातांचा धोका कायम