esakal | हिंगणघाट’सारख्या घटनांनी मला खुर्ची सोडावी वाटली ; राज्यपाल कोशियारी 
sakal

बोलून बातमी शोधा

bhagat sing koshyari

‘हिंगणघाट’सारख्या वेदनादायी घटनांनी मी व्यथित होतो. अशा घटनांनी मला अतीव दुःख वाटते. त्यामुळे मला मिळालेली खुर्ची धरू की सोडून द्यावी, असे वाटू लागले आहे.

हिंगणघाट’सारख्या घटनांनी मला खुर्ची सोडावी वाटली ; राज्यपाल कोशियारी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार ः ‘भ्रष्‍टाचार ही फार मोठी समस्या आहे. कायद्याच्या ठिकाणीही ती न्यायव्यवस्थेत होऊ शकते. त्यामुळे ती समूळ उच्चाटनासाठी तुम्हीच कायद्याचे शिक्षण घेऊन इमानदारीने काम करा. हिंगणघाट’सारख्या घटना पाहता मी आहे या खुर्चीवर राहावे की ती सोडावी, अशा मनःस्थितीत मी होतो,’ असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी आज येथील विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले. 

क्‍लिक कराः  आई उभी राहली...अन्‌ चिमुकला खिडकीतून झाला गायब ! 
 

राज्यपाल कोशियारी हे गुरुवारपासून (ता.२०) जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी शुक्रवारी नंदुरबार तालुका विधायक समितीच्या विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. खासदार डॉ. हीना गावित, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड उपस्थित होते. ॲड. जयंत जायभावे यांनी प्रास्ताविक केले. 

नक्की वाचा : घरी पोहचणार... तेवढ्यातच होत्याचे नव्हते झाले ! 
 

विद्यार्थ्यांनी आपल्या भागातील विविध समस्या मांडल्या. त्यात रोशनी वळवी हिने हिंगणघाट (ता. वर्धा) येथील घटनेबाबत कायद्याचा अंकुश नाही, याबाबत आपले मत काय, असा प्रश्‍न‍ केला. त्यावर राज्यपाल कोशियारी म्हणाले, की ‘हिंगणघाट’सारख्या वेदनादायी घटनांनी मी व्यथित होतो. अशा घटनांनी मला अतीव दुःख वाटते. त्यामुळे मला मिळालेली खुर्ची धरू की सोडून द्यावी, असे वाटू लागले आहे. पण, तुमच्यासारख्या तरुण पिढीने त्यासाठी जागृती केली पाहिजे. प्रत्येक पुरुष किंवा युवकाने रस्त्यावरून जाणारी प्रत्येक महिला माझी माता- भगिनी आहे, असा विचार केला पाहिजे. तशी भावना त्यांच्यात निर्माण होणे गरजेचे आहे. 

आर्वजून पहा : गाढ झोपेत होती ती...अन्‌ असे घडले, की ती झोपेमध्येच गेली !