नर्मदा बचावाचे आंदोलन...अफरोज अहमद गो बॅक'चा नारा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 March 2020

नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध करण्यासाठी अचानक तेथे धडक दिली. त्यांना बैठकस्थली जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न त्यांचा होता. यावेळी त्यांनी घोषणेबाजी करत अफरोज अहमद यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला.

 नंदुरबार ः नर्मदा प्राधिकरणाचे संचालक अफरोज अहमद यांनी नर्मदा प्राधिकरणाचे अध्यक्ष असतांना पुर्नवसनासंदर्भात खोटे अहवाल देऊन नर्मदा बाधितांचा विश्‍वास घात केला आहे. असे आरोप करत त्यांच्यावर न्यायालयात खटले सुरू व त्यांची सीबीआय चौकशी सुरू असताना नर्मदा प्राधिकारणाचे संचालकपद शासनाने बहाल केले. त्याचा निषेध करत अफरोज अहमद यांना बैठकस्थळी जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न आज नर्मदा बचाव आंदोलनाचा कार्यकर्त्यांनी केला. अफरोज अहमद गो बॅक असा नारा देत फलके दाखविण्यात आले. 
नर्मदा प्राधिकरणाचे संचालक अफरोज अहमद हे आज येथे आले होते. त्यांच्या उपस्थितीत आज जिल्हा आरोग्य प्रशिक्षण येथे बैठक होणार होती. त्यावेळी नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध करण्यासाठी अचानक तेथे धडक दिली. त्यांना बैठकस्थली जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न त्यांचा होता. यावेळी त्यांनी घोषणेबाजी करत अफरोज अहमद यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन कारवाई केली. 

आर्वजून पहा :  बापाला झाली अटक...बदनामीपोटी मुलाने उचलले टोकाचे पाऊल! 
 

नर्मदा बचावच्या मागण्या 
अफरोज अहमद यांना पदावरून हटवावे, त्यांना नर्मदा विस्थापितांसमोर आणून त्यांच्या कार्यक्रमात सहभागी करू नये, चार मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत त्यांचा सल्ला किंवा मार्गदर्शन घेऊ नये या मागण्या करण्यात आल्या आहेत. आंदोलनात लतिका राजपूत, पुन्या वसावे, चेतन साळवे, सियाराम पाडवी, खेमसिंग पावरा, किरसिंग वसावे, राजेश पाडवी, कृष्णा पावरा, गुलाबसिंग पावरा, जहागिर वसावे, वेलजी पावरा, गुंबा पाडवी आदी सहभागी झाले होते. या सर्वांना प्रतिबंधात्मक अटक करून सोडून देण्यात आले. 

क्‍लिक कराः खादी ग्रामोद्योगची जागा अखेर सरकार जमा 
 

कार्यकर्त्यांना अटक हा अन्याय ः पाटकर 
नर्मदा प्राधिकरणचे माजी अध्यक्ष व सध्याचे संचालक अफरोज अहमद यांनी नकली पदवी घेतल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. सीबीआय चौकशी सुरू आहे. त्यांनी दौऱ्याबाबत दाखविलेल्या खर्चात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केला आहे. अशा भ्रष्टाचारी व्यक्तीचा निषेध कऱण्यासाठी नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते गेले होते. शांततापूर्ण वातावरणात ते आंदोलन करत असतांना त्यांना झालेली अटक ही अन्यायकारक आहे असे नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी सोशल मिडियाद्वारे प्रतिक्रिया देत सांगितले. 

नक्की वाचा :   नेहेते परिवाराने जोपासला दधींचीचा वारसा
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Narmada Rescue Movement