जिल्ह्याबाहेरील नागरिकांना नंदुरबारमध्ये लसीकरणास बंदी

जिल्ह्याबाहेरील नागरिकांना नंदुरबारमध्ये लसीकरणास बंदी
corona vaccination
corona vaccinationcorona vaccination

नंदुरबार : जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’अंतर्गत (Break the chain) कडक निर्बंध लावले असताना शेजारील जिल्ह्यातील नागरिक नंदुरबार जिल्ह्यात लस (Corona vaccine) घेण्यासाठी बेकायदा प्रवेश करीत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड (Collector Rajendra Bharud) यांनी अन्य जिल्ह्यांतील नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवेशास व त्यांचे लसीकरण करण्यास बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. (nandurbar coronavirus vaccination nandurbar corona)

corona vaccination
मुद्रांक विक्री बंद..कामे खोळंबली; केली जातेय अडवणूक

नंदुरबार जिल्हा आदिवासीबहुल व दुर्गम जिल्हा आहे. बाहेरील नागरिक येथे लसीकरणासाठी येत असल्याने लसीकरण केंद्राच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासोबत कोविड-१९ विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता आहे. तसेच लसीकरणासाठी मर्यादित प्रमाणात प्राप्त डोस विचारात घेता स्थानिक नागरिक लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ही बंदी घातली आहे.

अत्‍यावश्‍यक कारणाशिवाय प्रवेश नसावा

आंतरजिल्हा बंदी असल्याने अन्य राज्य किंवा जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांच्या पासेसची पडताळणी करावी. जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवेश देऊ नये. अन्य जिल्ह्यातील नागरिक लसीकरणासाठी आल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना त्यांच्या जिल्ह्यात लसीकरण करून घेण्याबाबत कळवावे. कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com