esakal | नंदुरबार जिल्‍ह्यातील १९ जण हद्दपार..पोलिस अधीक्षकांचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

Police

नंदुरबार जिल्‍ह्यातील १९ जण हद्दपार..पोलिस अधीक्षकांचे आदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


नंदुरबार : आगामी गणेशोत्सव (Ganesh Festival) व नवरात्रोत्सव (Navratra Festival) काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था (Law and order) अबाधित राहावी, यासाठी जिल्ह्यातील तीन गुन्हेगारी टोळ्यांमधील (Criminal gangs) १९ जणांना पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित (Superintendent of Police Mahendra Pandit) यांनी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा: धुळे महापौर निवडणूक १७ सप्टेंबरला..भाजपचा लागणार कस


हद्दपार करण्यात आलेल्यांपैकी १४ जण नंदुरबार शहरातील असून, त्यांना दोन वर्षांसाठी, तर पाच जण शहादा तालुक्यातील असून, त्यांना एका वर्षासाठी हद्दपार केले आहे. नंदुरबार शहर, तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी बाधा ठरणाऱ्यांवरील दाखल गुन्ह्यांचा आढावा घेऊन प्रतिबंधक कारवाई करावी, याबाबत पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. त्यावरून ल पोलिस अधीक्षक कार्यालयात पाठविला होता.

हेही वाचा: साथरोगांचे थैमान..मनपाची कुंभकर्णी झोप; भाजपचे आंदोलन


नंदुरबार शहर हद्दीत राहणारे पप्पू ऊर्फ फारुख खान जहीर खान कुरैशी, नायाब खान जाहीर खान कुरैशी, फिरोज खान जहीर खान कुरैशी, सिकंदर खान जाहीर खान कुरैशी, राजू ऊर्फ फिरदोस खान जहीर कुरैशी, मुश्तकीन शेख शहाबुद्दीन कुरैशी, शेख इस्तीयाक अहमद हाजी अब्दुल रज्जाक, शेख अब्दुल रशिद शेख अब्दुल रज्जाक कसाई, शेख अल्ताफ शेख जमिल कुरैशी, शेख कलिम शेख जमिल कुरैशी, शेख जुबेर शेख मुश्ताक कुरैशी, रियाज अहमद मुश्ताक अहमद कुरैशी, निहाल अहमद शेख अश्पाक कुरैशी, शेख शकिल शेख इसाक कसाई, तर शहादा पोलिस ठाणे हद्दीत राहणारे महेंद्र धरम ठाकरे, आझाद विठ्ठल ठाकरे, मंगल शंकर ठाकरे, गोरख मोहन ठाकरे, शामा सरदार ठाकरे (सर्व रा. डामरखेडा, ता. शहादा) अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

loading image
go to top