corona stop
corona stop

सातपुड्याच्या दुर्गम भागात कोरोना; नंदूरबार प्रशासन अलर्टवर

अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी परिसरात कोरोना संसर्गामुळे काल रोजी 13 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

वाण्याविहिर : अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्यातील दुर्गम भागातील मोलगी परिसरात कोरोना सारख्या महामारीने शिरकाव केल्याने नंदूरबारची प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. त्यानुसार त्या भागात प्रतिबंधात्मक उपायोजना करण्याचे काम यंत्रणेद्वारे सुरू झाले आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी परिसरात कोरोना संसर्गामुळे काल रोजी 13 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यानंतर येथील गटविकास अधिकारी नंदकिशोर सुर्यवंशी यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी स्वप्निल मालखेडे यांच्याशी तालुक्यातील परिस्थिती चा आढावा घेऊन लागलीच मोलगी येथे शासकीय मुलांच्या वसतीगृहात विलगीकरण कक्ष तयार करून कर्मचारी नियुक्त केले आहेत.

विलगीकरण कक्ष तयार करण्याला सुरवात

मोलगी येथे शासकीय वस्तीगृहात विलगीकरण कक्ष तयार करण्यासंदर्भात गटविकास अधिकारी नंदकिशोर सुर्यवंशी यांनी स्वत इमारतीची पाहणी करून रुग्णांना आवश्यक सुविधा कश्या पध्दतीने देता येतील याविषयी मार्गदर्शन केले.

प्रशासकीय यंत्रणा लागली कामाला

अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी परिसरात मोठ्या प्रमाणात ताप, सर्दी चे रुग्ण आढळून येत असून येथे विलगीकरण कक्ष तयार करुन त्यांनी मोलगी येथे मुलांच्या शासकीय वसतीगृहाची पाहणी करून येथील ग्रामपंचायत सरपंच मनोज तडवी, व ग्रामविकास अधिकारी गुलाब धनगर यांना आपल्या स्तरावरुन कोरोना निर्मूलन करण्यासाठी मार्गदर्शन केले . तसेच सर्व उपस्थित खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डाॅक्टरांना सुचना देऊन सर्व रुग्णांची रॅपिड टेस्ट करून उपचार करण्यात यावेत अश्या सुचना देऊन आपणही काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले तसेच यासाठी आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच आरोग्य कर्मचारी तातडीने हजर करण्याचे आदेश दिलेत.यावेळी मोलगी ग्रामपंचायतीचे सरपंच मनोज तडवी, ग्रामविकास अधिकारी गुलाब धनगर, विस्तार अधिकारी पंचायत समिती अक्कलकुवा मोहिते,डॉ.अमोल उघे, अतुल चौधरी तसेच शिक्षक, खाजगी वैदयकीय डॉक्टर आदी उपस्थित होते.

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com