विद्यार्थ्यांची घरवापसी चक्क घोड्यावरून 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 May 2020

केंद्रशासनाने घरी जाण्यासअनुमती दिल्याने विविध ठिकाणी अडकलेले नागरिक, कामगार, विद्यार्थी आपल्या घराकडे मार्गस्थ होत आहे. त्यासाठी काहींकडे प्रवासाचे साधन अर्थात वाहन आहे तर काहींकडे नाही त्यामुळे काही कामगार आपल्यात सध्याच्या गावाकडे पायी जात आहेत.

ब्राम्हणपुरी : लाकडाऊनमध्ये घरी जाण्यास परवानगी मिळाली असली तरी अनेक विद्यार्थ्यांना वाहनच नसल्याने ते पायी निघाले आहेत. विशेषताः नगर, धुळे, जळगाव, औरंगाबादला असलेले अनेक विद्यार्थी धडगावकडे पायी येत आहे. थकलेल्या अनेकांनी जवळ थोडेफार पैसे असल्याने चक्क लहान घोडे खरेदी करीत त्यांच्यावर रपेट मारीत घराकडे कूच केली आहे. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने मागील चाळीस दिवसापासून अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यात केंद्रशासनाने घरी जाण्यासअनुमती दिल्याने विविध ठिकाणी अडकलेले नागरिक, कामगार, विद्यार्थी आपल्या घराकडे मार्गस्थ होत आहे. त्यासाठी काहींकडे प्रवासाचे साधन अर्थात वाहन आहे तर काहींकडे नाही त्यामुळे काही कामगार आपल्यात सध्याच्या गावाकडे पायी जात आहेत. यावर उपाय काढत पिप्री, धडगाव येथील युवकांनी एक वेगळीच शक्कल लढवली आहे. त्यांनी चक्क सारंगखेडा येथून लहान अश्व तीन ते चार हजाराला एक याप्रमाणे खरेदी करून आपल्या गावाकडचा प्रवास सुरू केला आहे. रस्त्याने मार्गस्थ होत ते आज दराफाटा येथे आले. पिंप्री धडगाव येथे जात असल्याचे त्यांनी सांगितले. घरी जाण्यासाठी कुठलेच वाहन मिळत नसल्याने त्यांनी हा पर्याय स्वीकारल्याचे सांगितले. त्यांच्या या राजेशाही घरवापसीला पाहून बघ्यांनी तोंडात बोटे घातली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar student horse riding home