घरात साठविला होता अवैध लाकूड साठा, माहिती मिळताच वन विभागाची कारवाई

विनायक सुर्यंवशी
Friday, 25 September 2020

जागेवर एक रंधा मशिन, एक बॉक्स दिवान असा मुद्देमाल जप्त करून शासकीय वाहनांने व खाजगी वाहनांने नवापूर येथिल शासकीय विक्री आगारात जमा केला.

नवापूर: रांयगणची फुलफळी (ता. नवापूर) येथे वन विभागाच्या पथकाने एका संशयित घराची सर्च वॉरंट ने झडती घेतली. घरात ताज्या तोडीचे साग, सिसम व शिवन साईजचे 49 कट साईज नग अवैद्य रित्या आढळून आला. एक रंधा मशिन, एक बॉक्स दिवान असा मुद्देमाल जप्त करून वन विभागाच्या आगारात जमा केला. सदर मुद्देमालाची अंदाजे तीन लाख रूपये आहे. 

आवश्य वाचा ः  'पाऊस सुसाट पण शेतकऱ्यांची पिकं भुईसपाट' !  
 

नवापूर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांना मिळालेल्या माहिती वरुन रांयगणची फुलफळी (ता. नवापूर) येथील संशयित आरोपी रणजीत झालु गावीत याच्या घराची सर्च वॉरंट ने झडती घेतली असता सदर घरात ताज्या तोडीचे साग साईज, सिसम साईज, शिवन साईज प्रजातीचे 49 कट साईज नग घडतळ केलेला लाकूड माल अवैद्य रित्या साठवणुक केलेला ठिक ठिकाणी आढळून आला. जागेवर एक रंधा मशिन, एक बॉक्स दिवान असा मुद्देमाल जप्त करून शासकीय वाहनांने व खाजगी वाहनांने नवापूर येथिल शासकीय विक्री आगारात जमा केला. सदर मुद्देमालाची अंदाजे तीन लाख रूपये आहे. सदर कार्यवाही वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, वनपाल डि. के.जाधव ( वडकळंबी), वनरक्षक सतीश पदमर, कल्पेश अहिरे, कमलेश वसावे, संतोष गायकवाड,नितीन पाटील, अनिल वळवी,संजय बडगुजर,दिपक पाटील यांनी केली आहे. 

वाचा ः कोणी फुकटात चारा घेता का ! शेतकऱयाने सोशल मीडियावर लढविली शक्कल
 

सदर गुन्ह्या बाबत नवापूर वनक्षेञपाल प्रथमेश हाडपे यांनी संबंधितल आरोपी नावे गुन्हा दाखल केला असून पुढील कार्यवाही उपवनसंरक्षक शहादा, उपविभागीय वनअधिकारी दक्षता पथक धुळे, सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news navapure forest department takes action against illegal timber hoarders