esakal | अरेच्चा...सहनशीलतीच्या प्रमाणपत्राचे वाटप

बोलून बातमी शोधा

ncp andolan imege jalgaon

गाळेधारकांचा प्रश्‍न प्रलंबित आहे, अतिक्रमण, हॉकर्स टाइमझोनची अंमलबजावणी देखील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लांबणीवर पडली आहे. याचा निषेध म्हणून सहनशीलता प्रमाणपत्र वाटप करून आंदोलन करण्यात आले.

अरेच्चा...सहनशीलतीच्या प्रमाणपत्राचे वाटप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः वर्षानुवर्षे अतिक्रमण, अस्वच्छता, बेशिस्त पार्किंग, हॉकर्स आदी समस्यांना जळगाव शहरातील दररोज सहन सहन करणारे नागरीक. रहिवासी नागरिकांकडून करवसुली करूनही प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून महानगरात रस्ते, वीज, पाण्यासह आरोग्याचा मूलभूत सुविधांचा अभाव आहे. असे असले तरी नागरिकांकडून हे सर्व सहन केले जात आहे याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांच्यातर्फे आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ कोर्ट चौक परिसरात नागरिकांना सहनशीलता प्रमाणपत्र वाटप करून प्रशासनाविरुद्ध आंदोलन करण्यात आले. 

शहरात अमृत योजनेंतर्गत रस्त्यांचे खोदकामामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. ठिकठिकाणी कचराकुंड्या व गल्लीबोळातील कचरा संकलनासाठी वॉटर ग्रेस कंपनीचा ठेका नियोजनाअभावी अपयशी झालेला आहे. या ठेकेदारावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. गाळेधारकांचा प्रश्‍न प्रलंबित आहे, अतिक्रमण, हॉकर्स टाइमझोनची अंमलबजावणी देखील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लांबणीवर पडली आहे. याचा निषेध म्हणून सहनशीलता प्रमाणपत्र वाटप करून आंदोलन करण्यात आले. शंभू रोकडे, स्वप्नील नेमाडे, प्रशांत राजपूत, रोहन सोनवणे, गणेश निंबाळकर, मजहर पठाण, तुषार इंगळे, अनिरुद्ध जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
 

नक्की वाचा : तापीतीरावर रंगणार गुरु-शिष्याचा उत्सव