कुत्र्यांच्या आवाजाने दरवाजा उघडला, आणि समोरचे दृश्य पाहून थरकाप उडाला ! 

सुरज खलाणे
Thursday, 10 December 2020

घराबाहेर कुत्रे मोठ मोठ्याने भुंकत असल्याचा आवाज आला. कुत्रे का भुकंत आहे हे पाहण्यासाठी खलाणे यांनी दरवाजा उघडला आणि कुत्र्यांच्या काही अंतरावर त्यांना बिबट्या दिसला.

नेर :धुळे जिल्ह्यातील नेर येथील म्हसदी रस्त्यालगत सतीश खलाणे यांचे शेतात घर आहे. सायंकाळ झालेली असल्याने दरवाजा बंद करून खलाणे कुंटूबासोबत होते. सायंकाळी सातच्या सुमारास त्यांना घराबाहेर कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज आला. आणि खलाणे यांनी घराचा दरवाजा उघडला आणि समोरचे दृष्य पाहून त्यांचा थरकापच उडाला.

आवश्य वाचा- दररोज दर्शन देणारा बिबट्या अखेर अडकला; पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी 

बऱ्याच दिवसांपासून बिबट्या महलकाळी, गाण्यदेव, रायवट शेतीशिवारात फिरत आहे. वन विभागाने या बिबट्याला तत्काळ जेरबंद करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्यात मंगळवारी सतीश खलाणे शेतातील घरात राहतात. शेतात घर त्यात थंडी तसेच सायंकाळ लवकर होत असल्याने परिसर शांत असतो. मंगळवारी सतीश खलाणे घरात असतांना त्यांना घराबाहेर कुत्रे मोठ मोठ्याने भुंकत असल्याचा आवाज आला. कुत्रे का भुकंत आहे हे पाहण्यासाठी खलाणे यांनी दरवाजा उघडला आणि कुत्र्यांच्या काही अंतरावर त्यांना बिबट्या दिसला.

पटकन दरवाजा बंद केला म्हणून जीव वाचला

खलाणे यांनी समोर काळालच पाहीले आणि ते भयभीत झाले. काही सुचण्या आधी त्यांनी पटकन दरवाजा बंद केला व घरात पळ काढला व आपला तसेच कुटूंबाचा जीव वाचविला. अन्यथा बिबट्याने घरातच प्रवेश केला असता.

सुदैवाने मुल होती घरात

खलाणे यांच्यासह घरात पत्नी व दोन लहान मुले होती. रोज सायंकाळी मुले बाहेर खेळतात. मात्र सुदैवाने मंगळवारी मुले घरातच होती. जर बाहेर खेळत असती तर मोठी घटना घडली असती.

आवर्जून वाचा- धुळ्यासह साक्रीत ५५० हेक्टरवर ‘एमआयडीसी’

 

कुत्र्याला केले ठार

काही वेळेतच बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला व कुत्र्याला ठार केल्याचे दृष्य खलाणे व त्यांच्या कुटुंबीयांनी खिडकीतून पाहत होते. हे दृष्य पाहता पाहता कुटुंबातील सदस्यांचे डोळे पाणावले.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news ner leopard attacked and killed the dog in front of the house