कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सार्वजनीक गणपती मंडळा ठिकाणी गर्दी टाळा

सुरज खलाने
Friday, 21 August 2020

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता सर्व सण आपण ठराविक नागरिकांमध्ये साजरा करत आहोत. यासाठी कोणीही गावात सार्वजनिक गणपतीची स्थापना करू नये.

 नेर ः कोरोनाच्या प्रादुर्भावाची साखळी खंडित होईल.व महाराष्ट्र राज्य प्रशासनाला सहकार्य करावे.असे उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी गणेश मंडळ गावातील सरपंच,पोलीस पाटील यांना बैठकीत सूचित केले.

नेर ता.धुळे पोलीस दूरक्षेत्र नेर याठिकाणी गणेश मंडळांना पूर्वसूचना देऊन आढावा बैठक झाली. .यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी साक्री विभाग श्रीकांत घुमरे,पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे,पी.एस.आय.सागर काळे,ए.एस.आय.चव्हाण उपस्थित होते.नेर गावासह खंडलाय बुद्रुक,बांबुर्ले,शिरधाने प्र.नेर,अकलाड,मोराणे, जुने भदाणे,नवे भदाणे,देऊर खुर्द,देऊर बुद्रुक,उभंड या गावांतील सरपंच,पोलीस पाटील,गणेश मित्र मंडळ,तसेच मूर्तिकार,यांना नेर पोलीस दूरक्षेत्र याठिकाणी बोलावून गणेश जयंती निमित्त पोलीस प्रशासनाकडून पूर्ववत सूचना देण्यात आल्या.

बैठकीस नेर येथील पोलीस नाईक प्रमोद ईशी, पोलीस हवालदार राजेंद्र मोरे,नेरसह परिसरातील सरपंच,पोलीस पाटील, गणेश मित्र मंडळातील तरुण मंडळ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे पी.एस.आय.सागर काळे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
 

गर्दी टाळा कोरोना पळवा
उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी गणेश मंडळांतील तरुणांना गणेश (बाप्पाच्या) स्थापने विषयी मार्गदर्शन केले.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता सर्व सण आपण ठराविक नागरिकांमध्ये साजरा करत आहोत. यासाठी कोणीही गावात सार्वजनिक गणपतीची स्थापना करू नये. यामुळे गर्दी होणार नाही आणि कोरोना पसरणार नाही. त्यासाठी नेर परिसरातील पोलीस पाटील यांनी देखील गावात गणपती स्थापने बाबत लहान मोठ्या मंडळाना सूचना कराव्यात असे घुमेर यांनी सांगितले.

 

मिरवणूक कोणी काढू नये-  गांगुर्डे

आपापल्या गावात गणेश स्थापना घरीच करावी.सध्या कोरोनाची गंभीर परिस्थिती सुरु आहे.म्हणून गणपती स्थापना तसेच आगमनाची व विसर्जनाची मिरवणूक सर्वदूर कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे थांबवावी यामुळे जास्त गर्दी होणार नाही.तसेच डी.जे.बँड इतर वेगळी वाजंत्री लाऊ नये.यंदाच्या वर्षी आपापल्या घरातच गणपती बाप्पाची स्थापना करावी.व मूर्तिकार यांनी किमान दोन फुटाच्या वर मूर्ती तयार करू नये.व विक्री करू नये.अशा पूर्ववत सूचना गावातील पदाधिकाऱ्यांना पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे दिल्या .

 

संपादन- भूषण श्रीखंडे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nere ganpati Mandal, meeting with village office bearers along with police administration