कांद्याच्या आगारात भावामध्ये  सव्वाशे ते सहाशे रुपयांची वाढ 

live
live


नाशिक ः कांद्याच्या आगारात नाशिक जिल्ह्यातील काही बाजारपेठांमधील लिलाव अमावस्येमुळे बंद राहिले. त्याचा चांगला परिणाम भावावर झाला असून कालच्या (ता. 27) तुलनेत आज सव्वाशे ते सहाशे रुपयांनी अधिकचा भाव क्विंटलला शेतकऱ्यांना मिळाला. संगमनेरला सर्वाधिक 11 हजार 111 रुपये क्विंटल असा भाव निघाला. 

सोलापूरमध्ये मध्यंतरी भावाने एकदम उसळी घेतल्याने राज्यभरातील शेतकऱ्यांची नजर इथल्या भावाकडे असतात. सोलापूरमध्ये साडेनऊ हजार, सातारामध्ये 8 हजार रुपये क्विंटल असा भाव होता. नागपूरमध्ये पाचशे रुपयांनी भाव घसरला आणि आज सात हजार रुपये क्विंटल भावाने कांद्याची विक्री झाली. पुण्यात मात्र पाचशे रुपयांनी भाव वाढले असून कांद्याला 8 हजार रुपयांचा भाव मिळाला. औरंगाबादमध्ये एक हजार रुपयांनी कांद्याच्या भावाने उसळी घेतल्याने शेतकऱ्यांना 7 हजार रुपये असा भाव मिळाला.

सर्वाधिक भाव

कळवणमध्ये दोन दिवसांपूर्वी 7 हजार 300 रुपये क्विंटल भावाने कांदा विकला असताना आज इथे 8 हजार 200 रुपये क्विंटल असा नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक भाव निघाला. कांद्याच्या पट्यातील ÷अल्वरमध्ये(राजस्थान) दोन दिवसांपूर्वी 8 हजार 750 रुपये असा, तर आज 8 हजार 375 रुपये असा भाव होता. महुआमध्ये (गुजरात) क्विंटलमागे 115 रुपयांची वृद्धी होत इथे कांद्याची 7 हजार 875 रुपये भावाने विक्री झाली. क्विंटलभर कांद्याचा आजचा भाव रुपयांमध्ये बाजारपेठनिहाय पुढीलप्रमाणे असून (कंसात कालचा भाव दर्शवतो) ः पिंपळगाव बसवंत-7 हजार 990 (7 हजार 771), येवला-7 हजार 476 (7 हजार 351), विंचूर-7 हजार 551 (7 हजार 151), चांदवड-7 हजार 700 (7 हजार 101), उमराणे-8 हजार 1 (7 हजार 680). 

बंगळुरु, पाटणा, मुंबई अन्‌ कोल्हापूरमध्ये भाव स्थिर 
बंगळुरु, पाटणा, मुंबई अन्‌ कोल्हापूरमध्ये दोन दिवसांमध्ये कांद्याचे भाव स्थिर राहिले आहेत. बंगळुरु, मुंबई, कोल्हापूरमध्ये 9 हजार, तर पाटण्यात साडेआठ हजार रुपये क्विंटल भावाने कांद्याची विक्री झाली. धुळ्यामध्ये दोन दिवसांपूर्वी 6 हजार रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला होता. आज इथे 7 हजार 100 रुपये असा भाव राहिला. पंढरपूरमध्ये मात्र दीड हजार रुपयांची घसरण होऊन साडेसात हजार रुपये असा भाव शेतकऱ्यांना मिळाला. चेन्नईमध्ये चार हजारांची घसरण होऊन आज दहा हजार रुपये क्विंटल भावाने कांद्याची विक्री झाली. कोलकोत्तामध्ये साडेसातशे रुपयांनी भाव कमी होत कांदा 9 हजार रुपये क्विंटल भावाने विकला गेला. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com