"नॉर्मल प्रसूती होईल..थांबा"..डॉक्टरांनी गर्भवतीच्या त्रासाकडे दुर्लक्ष केले...यामुळे आई अन् बाळ मात्र..

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 December 2019

मंगल रवींद्र यादव (28, रा. पिंपळद, ता. जि. नाशिक) या गर्भवतीस सोमवारी (ता.23) रात्री साडेदहाला जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले. मंगल या पोट दुखत असल्याचे वारंवार प्रसूती विभागातील डॉक्‍टर व परिचारिकांना सांगत होत्या. पण नॉर्मल प्रसूतीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगत संबंधितांनी गर्भवतीच्या त्रासाकडे दुर्लक्ष केले. बुधवारी सकाळी मंगल यांना जास्तच त्रास होऊ लागल्यानंतर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अजित तिदमे यांनी त्यांना प्रसूतीसाठी घेतले. त्या वेळी खूप त्रास होऊ लागल्याने गर्भवतीने त्रास होत असून, नॉर्मल न करता सीझर प्रसूती करा, अशी विनवणीही केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. पण तरीही नॉर्मल प्रसूती होईल, असे सांगत दुर्लक्ष केले.

नाशिक : जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गर्भवतीचा बुधवारी (ता.25) सकाळी प्रसूती होण्यापूर्वीच मृत्यू झाला. मातेच्या गर्भातील बाळाचाही अंत झाला. यामुळे संतापलेल्या नातेवाइकांनी डॉक्‍टरांच्या हलगर्जीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला. त्यानंतर सरकारवाडा पोलिस ठाणे गाठत संबंधित डॉक्‍टरवर कारवाई करण्यासाठीचे निवेदन दिले. कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याच्या भूमिकेमुळे तणाव वाढला, तर रुग्णालय प्रशासनाने इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याचे व त्या अहवालात डॉक्‍टरांची हलगर्जी आढळून आल्यास कारवाईचे आश्‍वासन दिल्यानंतर तणाव निवळला. 

अशी घडली घटना...

मंगल रवींद्र यादव (28, रा. पिंपळद, ता. जि. नाशिक) या गर्भवतीस सोमवारी (ता.23) रात्री साडेदहाला जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले. मंगल या पोट दुखत असल्याचे वारंवार प्रसूती विभागातील डॉक्‍टर व परिचारिकांना सांगत होत्या. पण नॉर्मल प्रसूतीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगत संबंधितांनी गर्भवतीच्या त्रासाकडे दुर्लक्ष केले. बुधवारी सकाळी मंगल यांना जास्तच त्रास होऊ लागल्यानंतर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अजित तिदमे यांनी त्यांना प्रसूतीसाठी घेतले. त्या वेळी खूप त्रास होऊ लागल्याने गर्भवतीने त्रास होत असून, नॉर्मल न करता सीझर प्रसूती करा, अशी विनवणीही केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. पण तरीही नॉर्मल प्रसूती होईल, असे सांगत दुर्लक्ष केले. यादरम्यान त्यांना झटके आले आणि त्या बेशुद्ध झाल्या. त्यानंतर त्यांना तत्काळ आयसीयूमध्ये दाखल करत व्हेटिंलेटर लावण्यात आले. पण सकाळी अकराच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अचानक झालेल्या या घटनेमुळे नातेवाइकांना धक्का बसला. डॉक्‍टरांच्या हलगर्जीमुळेच मंगलचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. तसेच संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करीत सरकारवाडा पोलिस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांनी निवेदन घेतले.

डॉक्‍टरांच्या हलगर्जीचा नातलगांचा आरोप,

पोलिसांनी ही बाब अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांच्या कानावर घातली. त्यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालय गाठून नातेवाइकांची भेट घेत गर्भवतीचे शवविच्छेदन तीन सदस्यीय समितीच्या उपस्थितीत इनकॅमेरा करण्याचे आदेश दिले. शवविच्छेदन अहवालात डॉक्‍टरांची हलगर्जी आढळून आल्यास तत्काळ कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन दिले. त्यानंतर सायंकाळी सातला मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. 

हेही वाचा > मुलीची देहविक्री...भरपूर पैसा..असे स्वप्न आईवडिलांचे..पण...

इनकॅमेरा शवविच्छेदन, दोषी आढळल्यास कारवाईचे आश्‍वासन 
नॉर्मल प्रसूतीसाठी प्रयत्न सुरू असताना आज सकाळी प्रसूतीदरम्यान, महिलेला झटके आले आणि ती बेशुद्ध झाली. व्हेटिंलेटर लावण्यात आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. नातलगांनी आरोप केल्यामुळे समितीच्या उपस्थितीत इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात येईल. डॉक्‍टरांची हलगर्जी उघडकीस आल्यास निश्‍चित कारवाई होईल. - डॉ. निखिल सैंदाणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय 

माझ्य पत्नीला त्रास होत असल्याने तिने स्वत: सिझर करण्याची विनंती केली, तरीही संबंधित डॉक्‍टरांनी दुर्लक्ष केले. त्यांच्या दुर्लक्षामुळे पत्नी आणि बाळाचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. - रवींद्र यादव, मृत महिलेचा पती.  

हेही वाचा > धरणावर फिरायला आलेले पर्यटक गाडीपाशी गेले..अन् गाडीत पाहिल्यावर धक्काच...कारण..

 शिक्षकाच्या खोलीतून वाफा बाहेर येत होत्या... त्यांनी खिडकीचा कप्पा उघडून पाहिला तर धक्काच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pregnant woman death in nashik district hospital Marathi News