पारोळा- बहादरपूर मार्गावर आयशर उलटून एक ठार, 35 जखमी 

accident parola
accident parola

पारोळा : बहादारपूर- पारोळा रस्त्यावर आयशर पलटून एक जण ठार, तर 35 जण जखमी झाले आहेत. यात 22 जण गंभीर जखमी असून उर्वरीत किरकोळ जखमी आहेत. ही घटना आज सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. 


धुळे येथील आयशर ट्रक (एमएच-18, 5535) मधून 40 ते 45 प्रवाशांना घेऊन जात होती. बहादरपूर येथे वीरांच्या कार्यक्रमासाठी ते आले होते. कार्यक्रम आटोपून आयशर ट्रक परतीच्या मार्गावर असताना सायंकाळी पाचच्या सुमारास मोंढाळे गावाजवळील वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यात ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात चिंधा बाबूराव रणदिवे (वय 50) हे जागीच ठार झाले. तर राज अनिल माळी (वय 12) धुळे, पूना संभाजी माळी (वय13, धुळे), अंशुमन सुदाम महाजन (वय 9, सुरत), हिराबाई देविदास माळी (वय 40, धुळे), शुभम राजेंद्र परदेशी (वय 16, धुळे) वसंत बाबुराव खैरनार (वय 52, धुळे), मीना वसंत खैरनार (वय 42, धुळे), रवींद्र शाळीग्राम पाटील (वय55, धुळे), सुकलाल शंकर महाजन (वय60, धुळे), सुदाम बाबूलाल सोनवणे (वय32, सुरत), देविदास दामू बडगुजर (वय70, धुळे), पंडित शंकर माळी (वय 72), जातीम प्रकाश माळी (वय14), गुलाब महाजन (वय 60, मंदाणे), वैशाली प्रदीप महाजन (वय32, सेंधवा), शीतल कैलास माळी (वय28, सुरत) विनिता प्रदीप महाजन (वय 10), कुणाल प्रदीप महाजन (वय 9) यांना डोक्‍यास जबर मार लागला. त्यांना लागलीच पारोळा कुटीर रुग्णालयातून धुळे येथे उपचारासाठी हलविण्यात आले. तर इतर 12 ते 13 नागरिकांना जास्त दुखापत झाली नसून त्यांची नावे मिळू शकली नाही. 

कुटीर रुग्णालयास यात्रेचे स्वरूप 
सदर घटना ज्याठिकाणी झाली त्या भागात विशेष नागरिकांची वस्ती नव्हती. परंतु मोंढाळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी दाखल होत मदतकार्यात हातभार लावला. यावेळी रुग्णवाहिका चालक रोशन पाटील, प्रसाद राजहंस, राजेंद्र वानखेडे, नंदू लोहार, शेख महताफ, शेख कुरेशी यांनी कुटीर रुग्न्लायात जखमींना आणले यावेळी जखमींवर डॉ सुनील परोचे, डॉ राहुल जैन , परिचारिका सरला पवार, दीपक सोनार अजय घटायडे यांनी प्रथमोपचार करत अति गंभीर चार रुग्णांना धुळे येथे हलविले. यावेळी घटनेचे वृत्त कळताच रुग्णांच्या नातवाईकांनी कुटीर रुग्णालयात धाव घेतली. यावेळी मोठी गर्दी झाली होती, पो.नि लीलाधर कानडे यांनी घटनास्थळी भेट देवून कुटीर रुग्णालयात धाव घेतली होती. याबाबत गुन्हा नोंद करण्याची प्रकिया सुरु होती.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com