esakal | दिलासादायक : जोगलखेडा येथील कोरोनाबाधीताच्‍या संपर्कातील चौदा जणांचे अहवाल निगेटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

corona negative

चौदाही जण निगेटिव्ह आल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. मात्र, धोका पुर्ण टळला नसुन येत्या आठ दिवसात त्यांच्यात दिसू शकतात. यासाठी लॉक डाऊनचे नियम पाळुन नागरिकांनी घरीच थांबण्याचे आवाहन प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी केले आहे. 

दिलासादायक : जोगलखेडा येथील कोरोनाबाधीताच्‍या संपर्कातील चौदा जणांचे अहवाल निगेटिव्ह 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पारोळा : नालबंदी (ता. भडगाव) येथील रहिवासी व पोलिस दलात कार्यरत असलेला कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे समोर आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या जोगलखेडा (ता. पारोळा) येथील ५६ जणांपैकी १४ जणांचे नमुने हे तपासणी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज (ता. ४) प्राप्त झाला असुन चौदाही जण निगेटिव्ह आल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. मात्र, धोका पुर्ण टळला नसुन येत्या आठ दिवसात त्यांच्यात दिसू शकतात. यासाठी लॉक डाऊनचे नियम पाळुन नागरिकांनी घरीच थांबण्याचे आवाहन प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी केले आहे. 

मालेगाव येथे कार्यरत कोरोना बाधित पोलिस कर्मचारी हा जोगलखेडा येथे २८ एप्रिलला आल्याने त्याच्या संपर्कात ५६ जण आले होते. याबाबत प्रशासनाने युध्दपातळीवर यंत्रणा राबवुन ५६ जणांना सप्तर्षी मल्टीपर्पज येथे क्‍वारंटाईन केले होते. त्यापैकी १४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आले आहे. गरज पडली तर १४ पैकी काही नमुने जे क्लोज काँन्टँक्टमधील आहेत ते पुन्हा पाठवावे लागणार आहे. तसेच येत्या आठ दिवसात त्यांच्यात लक्षणे दिसु शकतात. कारण त्यात एक वयोवृध्द आणि एक मधुमेह रुग्ण आहे. तसेच इतर ३९ जणांमध्ये येणाऱ्या आठ दिवसात लक्षणे दिसु शकतात. म्हणुन तीन किलोमीटरमधील गावांनी स्वत:हुन जनता कर्फ्यु पाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

कोरोना लढाईत जनतेचे सहकार्य महत्वाचे 
बाहेरगावचे आल्यास गावाबाहेर शाळेत अशा लोकांना ठेवुन त्यांना गावात प्रवेश न देता त्यांची जेवणाची सोय गावाबाहेर करा. प्रशासनाच्या मेहनतीवर पाणी न फिरविता लोकसहभागातुन कोरोना महामारीचा मुकाबला करणे गरजेचे आहे. धोका अजुन संपला नसुन अमळनेर, धुळे, जळगाव, मालेगावचे कोणी लपुन आले तर पोलिस प्रशासनास माहिती देण्याचे आवाहन प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी केले आहे. दरम्यान, १४ जणांचे अहवाल निगेटिव्ह असले तरी जोगलखेडा येथील संपर्कात आलेल्या व्यक्तींना सप्तर्षी मल्टीपर्पज येथेच क्‍वारंटाईन केले असल्याची माहिती प्रशासनाकडुन देण्यात आली. 

वेल्हाणेचे दोन नमुने तपासणी 
वेल्हाणे (ता. पारोळा) येथे मुंबई येथे रहीवाशी असलेले दोन व्यक्ती १२ एप्रिलला कोरोना बाधीत यांच्या संपर्कात आले होते. त्यांना क्‍वारंटाईन करुन त्या दोघांचे नमुने तपासणीसाठी पाठविले जाणार असल्याची माहीती वैद्यकिय अधिकारी डॉ. योगेश साळुंखे यांनी दिली. प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी जोगलखेडा परिस्थिबाबत आढावा घेत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता घरीच थांबण्याचे आवाहन केले आहे. स्वत: सह कुटुंबाची काळजी घ्या, मास्कचा वापर करा, गावाबाहेरुन व्यक्ती गावात आल्यास तात्काळ प्रशासनाला माहीती द्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी गोसावी, तहसिलदार अनिल गवांदे, पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे यांनी केले.