साहेब वीस वर्षापासुन या जागेवर...स्थलांतर करु नका 

संजय पाटील 
मंगळवार, 28 एप्रिल 2020

शहरातील नागरिकांची कोणतीच गैरसोय होणार नाही याची काळजी घेत पालिका निर्णय घेत आहे.आँग्रे तलाव परिसरात सर्व सुविधांची चाचपणी करुनच या ठिकाणी भाजीपाला विक्री करता येणार आहे.यामुळे कुणीही गैरसमज करुन न घेता शहानिशा करुनच प्रत्येकाला न्याय देण्याची भुमिका पालिकेची राहणार आहे.
- डाँ विजयकुमार मुंडे, मुख्खाधिकारी नगर परिषद,पारोळा 

पारोळा : भाजीपाला विकुन कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो.आता लाँकडाऊन काळात भाजी विक्रीची जागा स्थलांतर केली तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल.गेल्या वीस वर्षापासुन आम्ही वडीलोपार्जित बाजारपेठेत भाजीपाला विक्री करित आहे.अशी आर्तहाक महीलांनी मुख्खाधिकारी यांना दिल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान स्थलांतरीत जागेवर संपुर्णपणे सुविधा झाल्याशिवाय सर्वांनी भाजीपाला नेमुन दिलेल्या ठिकाणी विक्री करावा असे आवाहन  मुख्खाधिकारी यांनी केल्याने अखेर महीलांनी नरमाईची भुमिका घेत वादावर काही अंशी पडदा पडला आहे.

आर्वजून पहा : अनेकांचे प्राण वाचविणाऱ्या चालकाला हेरले कोरोनाने; पंधरावर्षीय मुलीचाही समावेश 

गेल्या अनेक वर्षापासुन बाजारपेठ परिसरात सर्वजण भाजीपाला विक्री करित होते.मात्र हातगाडी धारकांच्या वाढत्या अतीक्रमणामुळे पालिकेने कडक भुमिका घेत हातगाडीस बाजार पेठ परिसरात मनाई केली.
परंतु कोरोनाच्या संसर्गामुळे 23 मार्च पासुन लाँकडाऊन असल्याने भाजीविक्री ही शहरातील नऊ ठिकाणी विक्री करण्याची  परवानगी पालिकेने दिली.असे असतांना पालिकेने ता,27 रोजी नवीन निर्णय घेत भाजीपाला विक्री ही बसस्थानक परिसर लगत असलेल्या आँग्रे तलाव शाँपींग येथे होईल.या निर्णयाचे भाजीपाला विक्री करणार्या महीलांसह व्यापारी यांनी नाराजी व्यक्त करित या परिसरात कोणत्याच सुविधा नाहीत.महीला वर्ग हातगाडी घेवुन विक्री कश्या करतील असे नानाविध समस्यांचा पाढा महीलांना वाचल्यावर साहेब गेल्या अनेक वर्षापासुन नियमितपणे भाजी विक्रीचा व्यवसाय आम्ही करित आहे.सर्वच जण हे जागा मिळत असल्याच्या इराद्याने पालिकेत पावती फाडणेकामी गर्दी करित आहे.नियमित भाजी विक्री करणारे यापासुन वंचित राहणार नाही याची काळजी घेत पालिकेकडुन न्याय मिळावा अशी मागणी भाजीपाला विक्री करणार्यांनी केली आहे.

 

नक्की वाचा : जळगाव जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण; दोघांचाही मृत्यू 
 

दरम्यान आंग्रे तलाव परिसरात जागा मिळत असल्याचे पाहुन अनेकांनी पालिकेत पावती फाडुन भावगर्दी केली आहे.यात पालिकेची कसोटी पणाला लागणार असुन नियमित भाजी विक्री करणारे व्यावसायिकांना याकामी न्याय मिऴतो का ? हा कुतुहलाचा विषय आहे.

 

क्‍लिक कराः वहिवाटीच्या रस्त्यावरून घडले भलतेच 
 

जो तो आपल्या परिने जागेसाठी पाठपुरावा करेल मात्र महीलांबाबत पालिकेने न्यायाची भुमिका घ्यावी, नियमितपणे भाजी विक्री करुनच कुटुंबाचा उदरनिर्वाह करते.यासाठी पालिकेने जागा वाटप करतांना महीला व पुरुष असे समसमान वाटप करुन गरजुंना प्राधान्य द्यावे.
मिराबाई महाजन, भाजीपाला विक्रेता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola Vegetable sellers oter site parmishan Municipal Council