esakal | ऋषीपंचमीला येथे दरवर्षी असतो गजबजाट...यंदा मात्र राहिला शुकशुकाट
sakal

बोलून बातमी शोधा

prakasha

कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले प्रकाशा (ता.शहादा) या तिर्थक्षेत्री विविध सण उत्सवांना भाविकांची गर्दी होत असते.त्यातच ॠषीपंचमीला तर भाविकांच्या अक्षरशः जनसागरच उसळतो.

ऋषीपंचमीला येथे दरवर्षी असतो गजबजाट...यंदा मात्र राहिला शुकशुकाट

sakal_logo
By
भटेराम वाडीले

प्रकाशा : ऋषीपंचमी व्रताच्या विधिवत पुजनासाठी प्रकाशा तिर्थक्षेत्री लाखो भाविकांची अक्षरशः मांदियाळी असते.मात्र,कोरोना च्या पार्श्वभूमीवर आज येथे शुकशुकाट होता.ठिकठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. 

अवश्‍य वाचा -  या शहरात प्रथमच नाही बाप्पाची स्‍थापना...चौकात आहे शांतता 


कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले प्रकाशा (ता.शहादा) या तिर्थक्षेत्री विविध सण उत्सवांना भाविकांची गर्दी होत असते.त्यातच ॠषीपंचमीला तर भाविकांच्या अक्षरशः जनसागरच उसळतो. अरुंधतीसह सप्त ऋषींच्या पुजनासाठी महिला भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. सौभाग्य प्राप्तीसह सर्व पापांचे नाश व्हावे, यासाठी ॠषीपंचमी हे व्रत भाविक मोठ्या श्रध्देने करतात. गेल्या चार महिन्यांपासून कोरोना ने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यातच जिल्ह्यातील बाधीतांच्या वाढता आकडा चिंतेत भर घालणारा आहे. संक्रमणाला आळा घालण्यासाठी खबरदारीच्या नियमांचे पालन करणे, हा उत्तम उपाय आहे.

हेही वाचा - धुळे जिल्‍ह्‍यातील ही दोन गावे ५ सप्टेंबरपर्यंत लॉक!
 

एकही भाविक नाही
ॠषीपंचमीनिमित्त प्रकाशा तीर्थक्षेत्री दरवर्षी लाखो भाविक हजेरी लावतात. तापी नदीत आंघोळ, केदारेश्वर, काशिविश्वेश्वर, पुष्पदंतेश्वर मंदिरासह विविध महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी या व्रतासाठी येथे येऊ नये, असा मनाई ठराव ग्रामपंचायत प्रशासनातर्फे करण्यात आला होता. त्यामुळे केदारेश्वर मंदिर, तापी, गोमाई नदी घाटांसह अन्य मंदिर परिसरात शुकशुकाट होता. ऋषीपंचमीला या तीर्थक्षेत्री इतिहासात प्रथमच एकही भाविक आला नाही.रस्त्ये देखील ओस पडले होते. 

पोलिस बंदोबस्त 
कोरोना संक्रमणाला रोखण्यासाठी पोलिस,स्थानिक प्रशासन,महसूल,आरोग्य आदी विभागांकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत.प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिरावर ऋषीपंचमीनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिस खात्यातर्फे बैठक घेण्यात आली होती.तीत झालेल्या चर्चेत ऋषीपंचमीनिमित्त प्रकाशाला भाविकांनी येऊ नये, असा मनाई ठराव ग्रामपंचायत प्रशासनातर्फे काढण्यात आला होता.त्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम,निरीक्षक किसन नजनपाटील यांचे देखरेखीत उपनिरीक्षक निलेश वाघ,योगीता पाटील,कैलास माळी,हवालदार सुनील पाडवी यांचे सह १० पोलिस कर्मचारी ,गृहरक्षक दलाचे २५ जवानांना केदारेश्वर मंदिर परिसर,तापी ,गोमाई नदी घाट,संगमेश्वर,सिहंस्थ पर्वणीचे गौतमेश्वर मंदिर, सर्व रस्ते आदी ठिकाणी कडेकोट बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.सरपंच सुदाम ठाकरे,ग्रामविकास अधिकारी बाळू पाटील उपस्थित होते... 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image