live
live

खासगी जागेवरील अतिक्रमण हटविण्याची "सुपारी'  नोटीस न देताचं परस्पर कारवाई 

नाशिक- सार्वजनिक ठिकाणचे अतिक्रमण काढण्यासाठी तक्रारींची वाट पाहणाऱ्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून एका खासगी जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी दाखविण्यात आलेली तत्परता चांगलीचं चर्चेत आली असून संबंधिताला नोटीस न देताचं अतिक्रमण उध्वस्त करण्यात आल्याचा प्रकार जेलरोड भागात घडल्याने खासगी जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी "सुपारी' घेतली जात असल्याचा आरोप अतिक्रमण विभागावर होवू लागला आहे. 

शहरात सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढतं असताना त्यावर कारवाई करण्याऐवजी पालिकेच्या अतिक्रमण विभागाला खासगी जागांवरील अतिक्रमणे हटविण्यात चांगलाचं रस वाढला आहे. जेलरोड भागातील दसक शिवारातील राज राजेश्‍वरी मंगल कार्यालयाच्या परिसरातील लक्ष्मी केदार नगरी येथील असेचं एका खासगी जागेवरील अतिक्रमण हटविण्याची तत्परता या विभागाने दाखविली.

कारवाई सुरु

संतोष सुरेश शहरकर यांच्या मालकीच्या सुमारे साडे सहाशे वार या निवासी भुखंडावर गेल्या दहा वर्षांपासून मुर्ती बनविण्याचा व्यवसाय सुरु आहे. माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात शहरातील मोकळ्या भुखंडाचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असेल तर ते अतिक्रमण ठरवून हटविण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार दिड वर्षांपुर्वी श्री. शहरकर व्यवसाय करतं असलेल्या भुखंडावरील अतिक्रमण हटविण्यात आले होते. परंतू कुटूंबाची गुजराण या व्यवसायावर अवलंबून असल्याने पुन्हा मुर्ती बनविण्याचा व्यवसाय सुरु करण्यात आला. एखाद्या खासगी जागेवरील अतिक्रमण हटवायचे असल्यास त्यासाठी संबंधिताला नोटीस द्यावी लागते परंतू पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नोटीस न देता भुखंडावरचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली.

प्रश्नाची  मालिकाच

अतिक्रमण विभागाच्या या कारवाईने शहरकर कुटूंब रस्त्यावर आले. यासंदर्भात काय निर्णय व्हायचा तो होईल परंतू नोटीस न देता अतिक्रमण विभागाने केलेली कारवाई चांगलीचं चर्चेत आली असून खासगी जागांवरील अतिक्रमण "सुपारी' घेवून हटविले जात असल्याच्या आरोपांना पुष्टी मिळतं आहे. महापालिकेच्या सहा विभागात स्वतंत्र अतिक्रमण पथके असताना मुख्यालयातील अधिकारी महेंद्र पगारे व कैलास भागवत हे कारवाईत का सहभागी झाले? अतिक्रमण हटविताना नगररचना विभागाचा अभिप्राय का घेतला नाही? अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली तर संबंधितांकडून कारवाईचा खर्च का वसुल केला नाही? अतिक्रमण हटविताना प्रत्येक वेळी नोटीस बजवावी लागते या विभागाकडून अतिक्रमण विभागाने संबंधितांना नोटीस बजावून म्हणणे मांडण्याची संधी का दिली नाही? या सारख्या प्रश्‍नांनी अतिक्रमण विभागाच्या कार्यपध्दतीवर प्रश्‍न निर्माण केले आहे. 

नोटीस न देताचं स्वमालकीच्या भुखंडावरील शेड अतिक्रमण विभागाने हटविले. सदर जागेवर काही लोकांनी कब्जा केला असून दहशतीखाली कुटूंब वावरतं आहे.- संतोष शहरकर, भुखंड मालक. 

यापुर्वी नगररचना विभागाच्या अभिप्रायावरून एकदा अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे वांरवार अतिक्रमण होत असेल तर त्यासाठी नोटीस देण्याची आवशक्‍यता नाही.- राहुल पाटील, उपायुक्त, अतिक्रमण विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com