चांगली वार्ता...प्रशासनाच्या नियोजनतून रावेर कोरोनामुक्त 

दिलीप वैद्य 
शनिवार, 2 मे 2020

आपल्या शेजारच्या तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण आढळल्याने या टप्प्यात आधिक काळजी घ्यावी. युवकांनी विनाकारण अजिबात बाहेर फिरू नये. बाहेरच्या जिल्ह्यातील लोक गावांत आल्यास तातडीने गावातील सरपंचांना कळवा. 
- डॉ. अजित थोरबोले, उपविभागीय अधिकारी, फैजपूर.

रावेर : तालुक्याच्या सीमेला लागून असलेले मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, खंडवा आणि खरगोन तालुक्यात तसेच जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत असताना रावेर तालुका मात्र अजूनपर्यंत तरी कोरोनामुक्त आहे. येथील महसूल, आरोग्य आणि पोलीस प्रशासनाने त्यासाठी केलेले नियोजन तसेच रावेर आणि सावदा नगरपालिकांनी आणि ग्रामपंचायतींनी त्याची केलेली अंमलबजावणी याचेच हे अनुकूल परिणाम आहेत. आमदार शिरीष चौधरी यांनी अगदी सुरवातीला अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजन केले. 

आर्वजून पहा : आता तरी "भाजप' एकनाथराव खडसेंना संधी देणार का ? 
 

रावेर तालुक्यात जिल्ह्यात सर्वप्रथम गाव पातळीवरील कोरोना निर्मूलन समिती स्थापन केली गेली. प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले आणि तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी एप्रिलच्या सुरुवातीलाच या समितीचे नियोजन केले. पोलिस पाटील, सरपंच, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, कोतवाल, ग्रामसेवक आणि तलाठी यांनी गावात बाहेर गावाहून, जिल्ह्यातून, आणि राज्यातून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवावे त्यांना होम क्वारंटीन करून इतरांच्या संपर्क पासून वेगळे करावे असे नियोजन सुरुवातीपासूनच प्रभावीपणे राबवले गेले. सध्या विविध शाळांमध्ये सुमारे ३१० बाहेरून आलेल्या लोकांना क्वारंटीन करण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसमोर सोशल डिस्टनसिंग पाळण्यासाठी खुणा करण्यात येऊन तशी अंमलबजावणीही करण्यात आली. 

नक्की वाचा : परप्रांतीय मजूरांना रेल्वेने दिला आधार... भुसावळ स्थानकावर भोजनाची व्यवस्था !
 

आंतरजिल्हा सीमा बंद 
रावेर तालुक्याने जिल्ह्यात प्रथमच आंतरराज्य आणि अंतर जिल्हा सीमा बंद केल्या. पाल जवळील शेरीनाका आणि चोरवड येथे कसून चौकशी करूनच प्रवाशांना प्रवेश देण्यात येत आहे. येणाऱ्या सर्वच प्रवाशांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. रेशन दुकानांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून सकाळी ग्रामस्थांना टोकन देऊन त्या नंबर नुसार दिवसभर धान्य वाटप करण्यात आले त्यामुळे गर्दी झाली नाही. केळी उत्पादकांची मीटिंग घेऊन मजूर आणि शेतकऱ्यांना तोंडाला मास्क बांधणे, सोशल डिस्टनसिंग करणे, केळीच्या ट्रकचे निर्जंतुकीकरण करणे अशा सूचना देण्यात आल्या. तोंडाला मास्क न बांधणाऱ्या आणि सोशल डिस्टन्ससिंगचे पालन न करणाऱ्यांकडून १ लाख ३६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. 

ग्रामीण भागात प्रबोधन 
येथील प्रांताधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्या गाड्यांवर ध्वनिवर्धक बसविला असून त्यावरुन ते वेळोवेळी समाज प्रबोधन करत असतात. ग्रामीण भागात असलेली सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका वैद्यकीय अधिकारी, रावेर, पाल आणि सावदा येथील ग्रामीण रुग्णालये, ग्रामीण भागातील पोलिसपाटील, आशा वर्कर यांनी अतिशय उत्कृष्ट कार्य केले. रावेर आणि सावदा पालिकांच्या सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतल्यामुळे शहरात किंवा तालुक्यात अजून तरी कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. क्‍लिक कराः रेशन दुकानांवर केशरी शिधापत्रीका धारकांना धान्य वाटप सुरू ! 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Raver corona free raver from administration planning