परप्रांतीय मजूरांना रेल्वेने दिला आधार... भुसावळ स्थानकावर भोजनाची व्यवस्था !

परप्रांतीय मजूरांना रेल्वेने दिला आधार... भुसावळ स्थानकावर भोजनाची व्यवस्था !

भुसावळ  : देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे देभरातील मजूरवर्ग ठिकठिकाणी अडकून पडला असून, काहींनी शेकडो किलोमीटर पायी प्रवास करुन आपले गाव गाठले. मात्र अद्यापही लाखो मजूर अडकून पडले आहेत त्यांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनातर्फे नाशिकहून विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. भुसावळ स्थानकावर या प्रवाशांना प्रशासनातर्फे फूड पॅकेट आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन काळात देशभरातील उद्योगांसह रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील महानगरांमध्ये रोजगारासाठी गेलेले मजूर अडकून पडले आहेत. त्यांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या सुरु केल्या असून, नाशिक रोड-लखनऊ श्रमिक एक्स्प्रेसचे रवाना झाली. भुसावळ रेल्वे स्थानकावर या गाडीचे दुपारी दीडला आगमन झाले असता, गाडी सॅनिटाइज करण्यात करुन, प्रवाशांच्या जेवणाची व पाण्याची सोय करण्यात आली. गाडीला १७ डबे जोडण्यात आले. यात १२ स्लीपर, तर ४ सामान्य श्रेणीचे डबे जोडण्यात आले. ८३९ प्रवाशांना याद्वारे सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. नाशिक ते थेट लखनऊच्या प्रवाशांनाच गाडीमध्ये प्रवेश देण्यात आला. नाशिकशिवाय गाडीला भुसावळ, खंडवा, इटारसी, बिना, झांशी, कानपूर याठिकाणी फक्त तांत्रिक थांबा देण्यात आला आहे. या स्थानकावरून कोणीही प्रवाशांना प्रवेश तसेच उतरण्याची परवानगी नाही. तसेच काल (ता. १) रात्री देखील गाडी क्रमांक ०२१५३ ही सात डब्यांची नाशिक रोड ते भोपाळ गाडी मध्य प्रदेशातील अडकलेल्या परप्रांतीयांसाठी सोडण्यात आली. रात्री साडेबाराला भुसावळ स्थानकावर गाडीचे आगमन झाले होते. 

सुरक्षित अंतराचे पालन 
या गाडीत सुरक्षित अंतराचे पालन करीत, ७२ प्रवाशी क्षमता कोचमध्ये, फक्त ५२ प्रवाशांना बसविण्यात आले होते. तसेच प्रत्येक प्रवाशाच्या तोंडाला मास्क लावण्यात आले होते. भुसावळ रेल्वे स्थानकावर गाडी प्लॉट क्रमांक सहावर शनिवारी दुपारी दीडला आल्यानंतर तब्बल ८५० फूड पाकिटे तसेच हजारांपेक्षा जास्त पाण्याच्या बाटल्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनातर्फे वितरीत केल्या. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com