मास्क घालण्याचे सांगितल्याचा आला राग...थेट प्रांतधिकाऱ्याला केली धक्काबुक्की 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 मे 2020

मास्क का घालत नाही म्हणून विचारणा केली असता फळ विक्रेता व दोघांनी अरेरावी, शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. प्रांताधिकारी यांनी तळेकर यांना त्यांच्या तावडीतून सोडवत पोलिस ठाणे गाठले.

रावेर ः शहरात मास्क घालण्याचे सांगितल्याचा राग आल्याने तिघांनी प्रांताधिकारी डॉ . थोरबोलेसह चालकास शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. ही घटना आज सकाळी घडली. याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

क्‍लिक कराःफौजदाराच्या पत्नीची डोक्‍यात गोळी झाडून आत्महत्या ;गडचिरोलीतील घटना ; कौटुंबिक वाद विकोपाला 
 

फैजपूर प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले चालकासह शहरातून लॉकडाऊनची पाहणी करीत होते. दरम्यान डॉ. आंबेडकर चौकात एक फळ विक्रेता मास्क न घालता फळ विक्री करीत होता. त्याच्या ढेलागाडी जवळ गर्दी होती. लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे पाहून प्रांताधिकारी यांनी चालक उमेश तळेकर यांना गाडी थांबवून विचारणा करण्यास सांगितले. तळेकर यांनी मास्क का घालत नाही म्हणून विचारणा केली असता फळ विक्रेता व दोघांनी अरेरावी, शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. प्रांताधिकारी यांनी तळेकर यांना त्यांच्या तावडीतून सोडवत पोलिस ठाणे गाठले. उपनिरीक्षक मनोज वाघमारे व संदीप धनगर यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना ताब्यात घेतले. याबाबत रावेर पोलिस ठाण्यात चालक उमेश तळेकर यांनी फिर्यादीवरून संशयित मजीद मलक मुस्ताक, मुस्ताक मलक गफूर, सादीक मलक गफूर यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

नक्की वाचा : जळगावने गाठली शंभरी; नवे दहा कोरोना बाधित 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver governor officer wear mask but angrr hokarse officer pushbak