अरेच्चा....! चोरट्यांनी पळविले रावेरचे पाणी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सध्या दोन छोट्या कूपनलिकावरून शहरात अल्पसा पाणीपुरवठा होत आहे. मात्र पालिका हद्दीतील रेल्वेस्थानक रस्त्याला लागून असलेल्या वसाहतीमध्ये पाण्याचा ठणठणाट झाला आहे.

रावेर ः येथील पालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या केंद्राजवळचा विजेचा ट्रान्सफॉर्मर चोरी होऊन आज पाचवा दिवस उजाडला तरीही शहराचा पाणीपुरवठा अजूनही विस्कळीतच आहे. पालिका हद्दीतील रेल्वेस्थानक रस्त्यावरील वसाहतीत आणि हद्दीबाहेरील पण पालिकेचा पाणीपुरवठा असलेल्या वसाहतीमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. 

क्‍लिक कराः  सोने 72 तासांमध्ये 1700 रुपयांनी वधारले
 

१८ फेब्रुवारी रात्री येथील पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा ऐनपूरच्या जॅकवेल जवळील ट्रांसफार्मर अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील तांब्याची वायर चोरून नेली होती. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सध्या दोन छोट्या कूपनलिकावरून शहरात अल्पसा पाणीपुरवठा होत आहे. मात्र पालिका हद्दीतील रेल्वेस्थानक रस्त्याला लागून असलेल्या वसाहतीमध्ये पाण्याचा ठणठणाट झाला आहे.चौधरी नगर,स्वामी समर्थ नगर,पोलीस लाईन, विद्यानगर तसेच रेल्वेस्थानकाला लागून असलेल्या शिक्षक कॉलनी, रामचंद्र नगर, गोपाल नगर, जगन्नाथ नगर, मानकर नगर, सुमन नगर आदी वसाहतीमध्ये पुरेशा प्रमाणात टॅंकर पोचले नाहीत. यामुळे पाणी टंचाई जाणवत आहे. पालिका हद्दीबाहेर असलेल्या परंतु पालिकेचा पाणीपुरवठा असलेल्या विश्वकर्मा नगर सारख्या वसाहतींमध्ये गेल्या पाच दिवसांपासून पाण्याचा एक थेंबही मिळालेला नाही यामुळे नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. 

आर्वजून पहा : पाण्यावर तरंगणारी चप्पल दिसली...अन्‌ गावावर शोककळाच पसरली ! 
 

जळगावहून मागविला ट्रान्सफॉर्मर 
दरम्यान, आज पाचव्या दिवशी नगरपालिकेने जळगाव येथून भाड्याने ट्रान्सफॉर्मर मागविला आहे तो बसवण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. उद्या सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे.दरम्यान, पालिकेला सुटी असल्याने पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित न झाल्याने अडचणी वाढल्याचे नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांनी सांगितले.

नक्की वाचा : मेहरुण तलाव परिसरात हजार वृक्षांची वनराई 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver thieves escaped the water of Raver