esakal | सारगखेडाचे प्रसिध्द एकमुखी दत्ताचे मंदिर कोरोना युध्दाच्या हस्ते उघडणार
sakal

बोलून बातमी शोधा

सारगखेडाचे प्रसिध्द एकमुखी दत्ताचे मंदिर कोरोना युध्दाच्या हस्ते उघडणार

गर्दी टाळण्यासाठी भाविक लवकर दर्शन घेऊन बाहेर पडतील , यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहीती सारंगखेडा एक मुखी दत्त मंदिर विश्वस्थानी दिली आहे.

सारगखेडाचे प्रसिध्द एकमुखी दत्ताचे मंदिर कोरोना युध्दाच्या हस्ते उघडणार

sakal_logo
By
रमेश पाटील

सारंगखेडा : मंदिरे ही भाविकांसाठी चैतन्यस्त्रोत आहेत . मंदिरात येणाऱ्या भाविकांवर पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्यांसह अनेकांची उपजीविका असते . त्याला खिळ बसली होती .परंतू पाडव्याच्या मुहूर्तावर ही मंदिरे खुली होत आहेत . त्यामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला असून उद्या .( ता. 16 ) सारंगखेडा येथील महानुभाव संप्रदायाचे एकमुखी दत्त मंदिर कोरोना योध्दाच्या हस्ते महाभिषेक करून खुले करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर विश्वस्थांनी दिली.

वाचा- धुळे जिल्ह्यात सुपर स्प्रेडर रोखण्यासाठी शोध मोहिम ! -

गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली धार्मिक स्थळे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू होणार असल्यामुळे शासनाकडून दिवाळीची भेट मिळाल्याचे मत भक्तांकडून व्यक्त करण्यात आले . मंदिर प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी दर्शनाच्या रांगेत सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासोबत , सॅनिटायझर ची व्यवस्था करण्यात येणार आहे . मंदिरात प्रवेश करतांना भाविकांना मास्क सक्तीचा राहील . सभामंडपात बसता येणार नाही. गर्दी टाळण्यासाठी भाविक लवकर दर्शन घेऊन बाहेर पडतील , यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहीती सारंगखेडा एक मुखी दत्त मंदिर विश्वस्थानी दिली आहे.

कोरोना युध्दांच्या हस्ते पूजन

सोमवारी सकाळी 7 वाजता कोरोनाकाळात गावात रुणांवर उपचार करणारे कोरोना योध्दांचा हस्ते महाभिषेक करून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे . उटी ,आरती , उपहार चा कार्यक्रम करून मंदिर खुले करण्यात येणार आहे , यावेळी चेतक फेस्टीव्हल समितीचे अध्यक्ष जयपाल रावल व मंदिर विश्वस्थ उपस्थित राहतील.

आवश्य वाचा- पुण्यावरून दिवाळीला घरी येत होता, दुदैवी घटनेचा निरोप येताच गावावर पसरली शोककळा -

मंदिरे सुरु झाली याचा आम्हाला आनंद आहे . सरकारच्या निर्देशांचे पालन करण्यात येईल . भाविकांच्या दर्शनासाठी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत . भाविकांनी पूजेचे साहित्य आणू नये , स्वयंशिस्त पाळावी . दर्शनासाठी गर्दी करू नये .
भिक्कन पाटील, सचिव, दत्त मंदिर विश्वस्थ. सारंगखेडा .

संपादन- भूषण श्रीखंडे