त्या क्लास चालकांनी केले क्लास बंद 

sakal impact
sakal impact

शहादा : नियम धाब्यावर बसवून खाजगी शिकवणी वर्ग घेणाऱ्या त्या क्लास चालकाने शिक्षण विभागाने कारवाईचा हातोडा उगारण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने घरी पोहोचविले. याविषयी 'सकाळ'ने आज कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ. खाजगी शिकवणी चालकांवर वरदहस्त कोणाचा ? या मथळ्याखाली आज वृत्त प्रसिद्ध होताच घाबरलेल्या व नियम धाब्यावर बसून अनधिकृतपणे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ खेळणाऱ्या त्या खाजगी शिकवणी वर्गाच्या संचालकांनी तात्काळ विद्यार्थ्यांना रिक्षाद्वारे आज पालकांच्या स्वाधीन केले. मात्र, शिक्षण विभाग कोवीड-19 अंतर्गत त्या चालकावर कोणती कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. 

कोरोना संसर्ग वाढत आहे. प्रशासन रुग्णांची साखळी तोडण्याकरिता अटोकाट प्रयत्न करत आहेत. लहान बालकांची रोग प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना घराबाहेर पडू देऊ नका, असे शासनातर्फे वारंवार आवाहन केले जात आहे. राज्यात शाळा महाविद्यालये पूर्णतः बंद आहेत. शासन ते सुरू करण्याचे धाडस अद्याप करत नसले तरी असलोद येथील खाजगी शिकवणी वर्गाच्या संचालकांनी मात्र ते करून दाखविले. बफर झोन मध्ये असलेल्या गावातच हा प्रकार घडला. आज शासन निर्देशानुसार त्या गावातील बफर झोन काढण्यात आले. दुर्दैवाने एखादा अनुचित प्रकार घडला असता तर याला जबाबदार कोण? हा मुद्दा उपस्थित होत आहे. 

सकाळी क्लास; दुपारी कंटेन्मेंट झोन...... 
दरम्यान शहरातही एका खाजगी शिकवणी वर्गाच्या संचालकाने सकाळी विद्यार्थ्यांना बोलावून शिकवणी वर्ग घेतले. त्या खाजगी शिकवणी वर्गात दहावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता, असे समजते. शिकवणी वर्ग सुटल्यानंतर अवघ्या काही तासातच शिकवणी वर्ग सुरू असलेल्या इमारतीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या त्या भागात कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आल्याने तो भाग प्रशासनाने सील केला. सुदैवाने शिकवणी वर्ग सुटल्यानंतरचा हा सगळा सोपस्कार पार पडला, अन्यथा विद्यार्थ्यांना ताटकळत तिथे उभे राहावे लागले असते. 

शिक्षण विभाग अनभिज्ञ ? 
दरम्यान, खाजगी शिकवणी वर्गाचा हा सारा प्रकार बिनदिक्कतपणे सुरू होता. सदरचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतरही संबंधित विभागाने साधी चौकशीही केले नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. शिक्षण विभागाचा आशीर्वादाने तर हे प्रकार सुरू नसावेत ना? अशीही चर्चाही सुरू आहे. निदान यापुढे तरी शिक्षण विभागाने लक्ष ठेवून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्यांचा पायबंद घालने आवश्यक आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com