गोमाईवर वीस फेजर-चेक डॅमला मंजुरी...३४२ हेक्टरक्षेत्र ओलिताखाली येणार 

गोमाईवर वीस फेजर-चेक डॅमला मंजुरी...३४२ हेक्टरक्षेत्र ओलिताखाली येणार 

ब्राम्हणपुरी  : जलसंधारण विभागामार्फत आकांक्षित नंदुरबार जिल्हा म्हणून शहादा तालुक्यात गोमाई नदीवर वीस चेकडॅम बांधण्यात येणार असून त्यापैकी सात कामांसाठी निधी मंजूर झाला आहे. या कामांचे भूमिपूजन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते झाले. या बंधाऱ्यांचे काम झाल्यास तालुक्यातील ३४२ ङक्टेर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकेल तसेच शहादा शहरासह सात गावांचा पाणीप्रश्‍न सुटू शकेल. 

पहिल्या टप्प्यात गोमाई नदीवर मलोणी, लोणखेडा, भागापूर, गोगापुर एक व दोन, जवखेडे श्रीखेड या सात ठिकाणे बंधारे बांधण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी शासनाने आठ कोटी १९ लाख ३० हजार १०३ रुपये निधी मंजूर केला आहे. या बंधाऱ्यामुळे शहादा शहरासह सात गावातील पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित १३ बंधाऱ्यांचे काम होईल. हे वीस बंधारे पूर्ण क्षमतेने तयार झाल्यास यात निर्माण होणाऱ्या जलसाठ्यामुळे तालुक्‍यातील सुमारे ३४२ हेक्‍टर क्षेत्र अप्रत्यक्षपणे ओलिताखाली येणार असल्याने त्याचा लाभ परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांना होणार आहे. 
भूमिपूजनावेळी आमदार राजेश पाडवी यांच्यासह सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, जलसंधारण अधिकारी रमेश व्ही. गावित, उपविभागीय जलसंधारण अधिकारी निलेश एस. पाटील, जलसंधारण अधिकारी बाळासाहेब डोळस, तेजस के. राहाणे, राकेश एस. पावरा, गणेश पी. पाटील क्षेत्रीय अभियंता शैलेश एस. अहिरे, पुष्पराज ए. पाटील आदी उपस्थित होते. 

असे असतील फेजर डॅम 
सुमारे पाच मीटर उंचीचे एकशे दहा मीटर लांबीचे हे बंधारे असतील. यात साधारणतः नदीपात्रात सातशे सघमी(सहस्त्र घनमीटर) साठवण क्षमता असणार आहे. नदीपात्रात पाचशे ते सातशे मीटरपर्यंत जलसाठा असणार आहे. पाणी अडवण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच प्लास्टिकच्या फळ्या वापरल्या जाणार आहेत. या बंधाऱ्यामुळे पावसाळ्यात नदीला येणाऱ्या पुराचे वाहून जाणारे पाणी अडविणे शक्य होईल. उन्हाळ्यातही नदीपात्रात जलसाठा असणार आहे, त्यामुळे सिंचनाच्या दृष्टिकोनातून हे बंधारे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com