टीईटीचे मुदत संपत आली तरी भरती रखडली 

निलेश पाटील
Saturday, 10 October 2020

शिक्षक होण्यासाठी डीएड.बीएड पूर्ण केल्यानंतरही शिक्षक पात्रता परीक्षा द्यावी लागते.2013 पासून आज मितीस पाच वेळा टीईटी परीक्षा घेण्यात आली.

शनिमांडळ : शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी)2013 मध्ये उत्तीर्ण झालेल्या 31 हजार उमेदवारांपैकी अपवाद वगळता बहुतेकांची मेहनत अजून दोन महिन्यात वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नियमानुसार या उमेदवारांची टीईटीची वैद्यता जानेवारी 2021 मध्ये संपणार आहे. 

आवश्य वाचा- बालाजी रथ कोसळला म्‍हणून बारा वर्षाचा होता खंड; आता पुन्हा रथयात्रा रद्द
 

शिक्षक होण्यासाठी टीईटी बंधनकारक करण्यात आली. राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण परिषदेने (एनसीटीई )2011 मध्ये या बाबत परिपत्रक काढले. त्यानंतर राज्याने 2013 मध्ये पहिली टीईटी घेतली.शासनाने शिक्षक भरतीवर बंदी घातली.तरीही टीईटीचे आयोजन केल्यावर शिक्षणशास्त्रातील पदवी किंवा पदविका घेतलेल्या लाखो उमेदवारांनी दिली.

पहिल्या वर्षी प्राथमिक म्हणजे पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी आणि उच्च प्राथमिक म्हणजे सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी अशा दोन्ही गटांसाठी मिळून जवळपास सहा लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती.त्यातील 31 हजार 72 उमेदवार पात्र ठरले.मात्र, गेल्या सात वर्षात यातील नोकरी मिळालेल्या उमेदवारांची संख्या अत्यल्प आहे. नियमानुसार परीक्षा पास झाल्याचा सात वर्षानंतर हे प्रमाणपत्र अवैध ठरते. अनेक उमेदवारांनी हजारो रुपयांचे शुल्क परीक्षेच्या तपासणीसाठी खर्च केले.

 पाच वेळा टीईटी परीक्षा आणि भरती फक्त एकदाच 
शिक्षक होण्यासाठी डीएड.बीएड पूर्ण केल्यानंतरही शिक्षक पात्रता परीक्षा द्यावी लागते.2013 पासून आज मितीस पाच वेळा टीईटी परीक्षा घेण्यात आली.मात्र भरती एकदाच झाली.डिसेंबर 2017 पासून सुरू झालेली प्रक्रिया अद्याप अर्धवटच आहे.बारा हजार पदांची घोषणा करून केवळ तीन ते चार हजार पदे भरण्यात आली.त्यामुळे अनेकांचे करिअर शासनाने बरबाद केले आहे.

वाचा- धोका टळलेला नाही, सर्व नियम काटेकोरपणे पाळा : जिल्हाधिकारी यादव

वर्ष। परीक्षा दिलेला उमेदवार पात्रउमेदवार
2013, 6,19,391 31,072
2014, 4,14,830 9,595
2015, 3,26,830 8,989
2017, 2,97,677 10,373
2018, 1,73,449 9,676  
 

संपादन- भूषण श्रीखंडे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shanimandal Teacher Eligibility TET Exam has expired but no teacher has been recruited