अरेच्चा : गावराण अंडीसाठी करावे लागते अ‍ॅडव्हान्स बुकींग; दोन आठवड्यांची वेटींग !

एल. बी. चौधरी
Tuesday, 3 November 2020

कोरोनापुर्वी ठेलारी महिला गावात थैली भरून अंडी विक्रीस आणत. भरपूर भटकंतीनंतर अंडी विकली जाई. आता अंडी घेण्यासाठी त्यांच्या वाड्यावर जावे लागते.

सोनगीर : कोरोनामूळे प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अंड्यांच्या मागणीत वाढ झालेली आहे.त्यात हिवाळा सुरू झाल्याने अंडीचा खप देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात सोनगिर येथे तर गावराणी अंडी घेण्यासाठी येथे किमान दोन आठवडे अ‍ॅडव्हान्स बुकींग करावी लागत आहे. तर बॉयलर अंडीचा खपही शेकड्याने वाढला आहे.

आवश्य वाचा- साक्री पश्चीम पट्टयात पिकतोय मणिपूरचा प्रसिद्ध काळभात !

कोरोनावर अद्यापही कोणतीही औषधी किंवा लस उपलब्ध नाही. मात्र, ग्रामस्थांनी गरम पाणी पिणे, वाफ घेणे, काढा पिणे तसेच, मांसाहार त्यातही अंडी खाण्याला प्राधान्य देत व मास्क लावल्यामुळे येथील कोरोना नियंत्रणात आला आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून कोरोनाचा एकही नवीन रूग्ण आढळून न आल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असले तरी कोणी गाफीलही नाही. तालुक्यात केवळ ४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

धुळे जिल्ह्याचा ९५ टक्के रिकव्हरी रेट

धुळे जिल्ह्यातील सर्वाधिक रिकव्हरी रेट ९५.५६ टक्के धुळे तालुक्याचा आहे. 
सोनगीरमध्ये जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत जाऊन ९१ पर्यंत पोहचल्याने ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दहा कोरोना रुग्णांचा मृत्यूही झाला. तर ८१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र कोरोना काळातील अंडी खाण्याची सवय कायम असल्याने गावराणी अंडी मिळत नाहीत अशी स्थिती आहे.

आता गावाबाहेर अंडी घेण्यासाठी जावे लागते

गावाजवळ पुर्व व पश्चिमेला ठेलारी समाजाची वस्ती असून ते मोठ्या प्रमाणात गावराणी कोंबड्या पाळतात. कोरोनापुर्वी ठेलारी महिला गावात थैली भरून अंडी विक्रीस आणत. भरपूर भटकंतीनंतर अंडी विकली जाई. आता अंडी घेण्यासाठी त्यांच्या वाड्यावर जावे लागते. आधी पैसे मोजून दोन आठवड्यानंतर ग्राहकाला अंडी मिळतात अशी स्थिती आहे. ते ही उपलब्ध असतील तेवढीच.  

वाचा- टोलप्लाझाचा अजब तर्क; अपघाताचे खापर फोडले फुलझाडांवर आणि केली कत्तल !
 

मागणी वाढली दर कायम

कोरोनामुळे प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून अंड्यांना मागणी वाढली होती. ही मागणी व त्यामुळे वाढलेले दर आजपर्यंत कायम आहे. गावराणी अंडी दहा रुपयांस एक तर, बॉयलर पाच रुपयांस मिळते. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news songir advance booking has to be done two weeks get the eggs