मोलमजुरी करणाऱ्या गरीब युवकांचे असे ही श्रीमंत मन !

 मोलमजुरी करणाऱ्या गरीब युवकांचे असे ही श्रीमंत मन !

सोनगीर : इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते ! ही सुटका अधिक चांगल्यापध्दतीने व्हावी म्हणून घरची अत्यंत गरीबी पण मनाने श्रीमंत असलेल्या व शेती, विटाभट्टी, ट्रॅक्टर व बांधकामावर मजूरी किंवा मिळेल ते काम करून पोटाची खळगी भरणाऱ्या बाबा ग्रूपच्या युवकांनी आपल्या कष्टाचे पैसे जमा करीत वैकुंठरथ विकत घेवून एक आदर्श निर्माण केला आहे.

सोनगीर येथील बाबा ग्रूपचे विशाल मोरे, भटू मोरे, सागर खैरनार, यशवंत ढिवरे, राजू पाडवी, कैलास मोरे, मिलिंद खैरनार, अविनाश मोरे, रवींद्र थोरात, दीपक मोरे, योगेश मोरे, मयूर मोरे, सनी मोरे, गोकुळ मोरे, वैभव मोरे, अजय थोरात आदींनी रोजच्या मजूरीतून काही पैसे वाचवत व ते पुरेसे जमल्यावर वैकुंठरथ घेतला.

अशी सुचलनी संकल्पना

काही भागापासून अमरधाम दीड ते दोन किलोमीटर लांब असल्याने अंत्ययात्रा नेतांना अनेक समस्या निर्माण येत होत्या. या समस्या लक्षात घेवून वैकुंठरथ घेण्याची कल्पना युवकांना येत त्यांनी रोजच्या त्यांच्या मजुरीतून पैसे गोळा करत वैकुंठरथ घेतला.

सेवेसाठी वैकुंठरथ खुला !

पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन यांच्या हस्ते युवकांनी घेतलेल्या वैकुंठरथाचे पूजन व नारळ वाढवून सेवेसाठी खुला केला. मयतासाठी रथ मोफत उपलब्ध असणार आहे. तसेच यापुढेही गावविकासासाठी आम्ही तयार राहू अशी भावना युवकांनी यावेळी केली. 

कार्याचे कौतुक

लोकार्पण सोहळ्यात जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौधरी, माजी उपसरपंच धनंजय कासार, प्रकाश गुजर, विशाल मोरे, रविराज माळी, किशोर पावनकर, आरीफ खॉ पठाण, प्रमोद धनगर,नंदू धनगर, रवींद्र माळी, डॉ. कल्पेश देशमुख, पराग देशमुख, भटू मोरे, अविनाश खैरनार, यशवंत ढिवरे, राजूबाबा पाडवी आदी उपस्थित होते. युवकांनी असेच विधायक उपक्रम राबवावे. बाबा ग्रूपचे कार्य कौतुकास्पद आहे. अशी प्रशंसा अविनाश महाजन यांनी केली. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com