esakal | धुळे जिल्ह्यात रब्बी हंगामात 70 टक्के पेरणी 
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे जिल्ह्यात रब्बी हंगामात 70 टक्के पेरणी 

धुळे जिल्ह्यात रब्बीसाठी सरासरीच्या तुलनेत 32 हजार 146 हेक्टर क्षेत्र वाढणार असल्याचे कृषी खात्याचाा अंंदाज आहे.

धुळे जिल्ह्यात रब्बी हंगामात 70 टक्के पेरणी 

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर : जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने तलाव, विहिरी, धरणे फुुल्ल भरली असून रब्बी हंगामात शेेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पेरणी केली आहे. जिल्ह्यात रब्बीची सरासरीच्या तुलनेत 70.74 टक्के पेरणी झाली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही जिल्ह्यात गव्हाची सर्वाधिक म्हणजे 25969 हेेक्टर पेरणी झाली आहे. सध्या बऱ्यापैकी थंडी असल्याने रब्बी पेरणीस वेग आला आहे. डिसेंबर अखेरपर्यंत पेरणी सुरू असते. 

वाचा-  दुर्दैवी घटना;  कार अपघातात आई सह तीन वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

जिल्हय़ात रब्बीसाठी 90 हजार 124 हेक्टर क्षेत्रात पेरणी होते. यंंदा भरपूर पाणी उपलब्ध असल्याने एक लाख असून 22 हजार 270 हेक्टर क्षेत्रात पेरणी होईल अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत 63 हजार 761 हेेेक्टर पेरणी झाली आहे. धुळे तालुक्यात सर्वाधिक म्हणजे सरासरीच्या तुलनेत 84.90 तर साक्री तालुक्यात सर्वात कमी म्हणजे 62.01 टक्के पेरणी झाली आहे. 

धुळे तालुक्यात 17 हजार 500 हेक्टर क्षेत्रापैकी 14 हजार 858 हेक्टर म्हणजे 84.90 टक्के, साक्री तालुक्यात 20 हजार 738 हेक्‍टरपैकी 12 हजार 860 हेक्टर म्हणजे 62.01 टक्के, शिरपूर तालुक्यातील 19 हजार 708 हेक्टर पैकी 15 हजार 150 हेक्टर म्हणजे 76. 87 टक्के, आणि शिंदखेडा तालुक्यातील 32 हजार 178 हेक्टर पैकी 20 हजार 893 हेक्टर म्हणजे 64. 92टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात ज्वारी, गहू, मका, हरभरा, करडईचे उत्पन्न घेतले जाते. मात्र यंदा करडईसह इतर कोणतेही गळीत धान्याचे उत्पन्न घेेण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात गहू व हरभराचे क्षेत्र सर्वात जास्त असून भाताचे सर्वात कमी क्षेत्र मक्याचे आहे. इतर तृणधान्य व कडधान्य अनुक्रमे 19 व 714 हेक्टर पेरणी झाली आहे. यंदा धुळेे तालुक्यात सात हजार पाचशे हेक्टर अधिक पेरणीची अपेक्षा असूून साक्री तालुक्यात 11 हजार 512 हेक्टर, शिरपूर तालुक्यात 14 हजार 212 हेक्टर क्षेत्र वाढीची शक्यता आहे. मात्र शिंदखेडा तालुक्यात रब्बीचे 1078 हेक्टर क्षेत्र घटणार आहे. जिल्ह्यात रब्बीसाठी सरासरीच्या तुलनेत 32 हजार 146 हेक्टर क्षेत्र वाढणार असल्याचे कृषी खात्याचाा अंंदाज आहे. हा अंदाज खरा ठरला तर यंदा एक लाख 22 हजार 270 हेक्टर एवढी विक्रमी पेरणी होऊ शकते. 

वाचा- घोड्यांच्या टापांचा आवाज येईल अन नाचतील; महोत्सव आयोजनाची अपेक्षा


पीक सरासरी क्षेत्र प्रस्तावित क्षेत्र पेरणी क्षेत्र

ज्वारी - 11064 14955$ 10034
गहू - 44083 61265 25969
मका - 7927 8850 5332
इतर तृणधान्य - 311 00 19
हरभरा - 26066 36700 21646
इ. कडधान्य 613 500 714 

एकूण 90124 122270 63761  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image